Sunday, April 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ब्रेन डेड रुग्णावर डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण; अमेरिकेतील डॉक्टरांनी केलेला प्रयोग झाला यशस्वी

by प्रभात वृत्तसेवा
October 22, 2021
in आरोग्य वार्ता
A A
ब्रेन डेड रुग्णावर डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण; अमेरिकेतील डॉक्टरांनी केलेला प्रयोग झाला यशस्वी
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

न्यूयॉर्क – ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या एका रुग्णावर एका डुकराचे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचा प्रयोग अमेरिकेतील डॉक्टर्सनी केला असून या प्रयोगाला यश मिळाले आहे. या ब्रेन डेड व्यक्तीचे इतर सर्व अवयव व्यवस्थित काम करत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

न्यूयॉर्कमधील मॅनहटन येथील एनवाययू लांघन ट्रान्सप्लांट इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर्सनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. या रुग्णाच्या किडनीनेही काम करणे थांबवले होते तेव्हाच डॉक्टरनी अशा प्रकारचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला .ज्या डुकराचे मूत्रपिंड त्यासाठी वापरण्यात आले या डुक्करांमध्ये प्रथम मानवी जीन्सचे स्थलांतर करण्यात आले.

या प्रयोगाची माहिती देताना इन्स्टिट्यूटचे डॉक्टर रॉबर्ट माऊंटमोगरी म्हणाले आगामी कालावधीमध्येही किडनी प्रत्यारोपणासाठी डुकरांचा सोर्स म्हणजेच स्त्रोत म्हणून वापर करणे शक्य होणार आहे. मानवी शरीरामध्ये जेव्हा एखाद्या अवयवाचे प्रत्यारोपण करण्यात येते तेव्हा अनेक वेळा ते अवयव उपलब्ध होणे अवघड जाते अनेक अवयवांची टंचाई जाणवते ही टंचाई दूर करण्याचे काम अशा प्रकारचे प्रयोग करू शकतील असा दावा या संस्थेने केला आहे.

अमेरिकेत सध्या एक लाख दहा हजार लोक अवयव प्रत्यारोपणाच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यापैकी तब्बल 90 हजार रुग्णांना मूत्रपिंडाची गरज आहे. या संस्थेने केलेल्या प्रयोगामध्ये प्रथम डुक्करांमध्ये मानवी जीन्सचे स्थलांतर करण्यात आल्यामुळे डुकराची किडनी मानवी शरीराने स्वीकारण्यात कोणतीच अडचण निर्माण झाली नाही.

अमेरिकेत किडनी प्रत्यारोपणासाठी कोणत्याही रुग्णाला किमान तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागते हा प्रतीक्षा कालावधी आता या प्रयोगानंतर कमी होऊ शकतो असा दावाही या इन्स्टिट्यूटने केला आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar