Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

बाळ आहे खास.. म्हणून काळजीही खास.! थंडी आणि प्रदूषणात नवजातांना असे ठेवा सुरक्षित

by
December 17, 2025
in फिटनेस
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

Health News : थंड हवामानाची सुरुवात होताच देशातील अनेक राज्यांमध्ये प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत नवजात बालकांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते. कारण नवजातांचे रोगप्रतिकारक तंत्र (इम्यून सिस्टम) मोठ्या मुलांच्या तुलनेत कमकुवत खूपच असते.

त्यामुळे थंड हवा, धूळ आणि प्रदूषित वातावरणाचा त्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो. वेळेवर योग्य काळजी घेतल्यास थंडी आणि प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.

नवजातांवर थंडी आणि प्रदूषणाचे दुष्परिणाम :

थंड हवामानामुळे बाळांना सर्दी-खोकला, भूक कमी होणे, झोपेत बिघाड आणि संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे, प्रदूषित हवा श्वसनमार्गावर परिणाम करत फुफ्फुसातील संक्रमण, सतत खोकला-शिंका आणि एलर्जीची समस्या निर्माण करू शकते.

तज्ज्ञांच्या मते, नवजातांमध्ये खालील लक्षणे दिसू लागल्यास ती गंभीर असू शकतात…

– ताप येणे

– सतत रडणे

– कमी झोप लागणे

– श्वास घेण्यास त्रास होणे

ही लक्षणे दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते.

थंडी आणि प्रदूषणात नवजातांची काळजी कशी घ्यावी?

नवजातांना थंडीत उबदार ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यासाठी हलके पण उबदार स्वेटर, टोपी आणि मोजे घालावे तसेच घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी एअर प्युरीफायरचा वापर करावा. बाहेर घेऊन जाताना वेळ कमी ठेवावा.

सर्दी-खोकला दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा :

तज्ज्ञांच्या मते, नवजातांना थोड्या वेळासाठी ऊन दाखवणे फायदेशीर ठरते, कारण त्यामुळे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता भरून निघण्यास मदत होते. सर्दीत गार पाणी वापरणे टाळून फक्त कोमट पाण्याने हलके स्नानच योग्य असते.

काळजी घेण्याच्या महत्त्वाच्या सूचना :

– बाळाला नेहमी स्वच्छ आणि उबदार कपड्यांमध्ये ठेवा

– घरातील धूळ आणि प्रदूषण कमी करण्याचे उपाय करा

– थंडी आणि प्रदूषणात बाळाला जास्त वेळ बाहेर नेणे टाळा

– कोणतेही आरोग्यविषयक लक्षण दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घ्या

Join our WhatsApp Channel

The post बाळ आहे खास.. म्हणून काळजीही खास.! थंडी आणि प्रदूषणात नवजातांना असे ठेवा सुरक्षित appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar