मुंबई : आपण सर्वजण स्वयंपाक करताना आले वापरतो. याशिवाय चहा आणि इतर पदार्थ बनवण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. मात्र सध्या बाजारात बनावट आले मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. तुम्हीही बाजारातून आले खरेदी करत असाल आणि वापरही करत असाल. अशा परिस्थितीत, आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
आल्याचे नियमित सेवन आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. हे रोज खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर समस्या दूर होतात. दुसरीकडे, बाजारात विकल्या जाणाऱ्या या बनावट आल्याचे सेवन केल्यास आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या तुम्हाला सतावू शकतात. अशा स्थितीत बाजारात विकले जाणारे बनावट आले ओळखणे गरजेचे आहे. चला तर मग, आज आम्ही तुम्हाला त्या पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही खरे आणि बनावट आले ओळखू शकता. सविस्तर जाणून घेऊया.
* आल्याचा वास घेऊन तुम्ही खरे आणि बनावट आले ओळखू शकता. आले खरे असेल तर त्याचा वास तिखट असेल. तसेच आले बनावट असल्यास, त्याला कोणताही वास येणार नाही.
* आल्यामध्ये नखे टोचूनही तुम्ही त्याची वास्तविकता जाणून घेऊ शकता. नखे टोचल्याने आल्याची साल निघते, त्यानंतर त्यातून तिखट वास येऊ लागतो.
* जर आल्याची साल खूप कडक असेल तर हे बनावट आले आहे हे समजून घ्या. तुम्ही अशा प्रकारचे आले विकत घेऊ नका.
* अनेकजण स्वच्छ दिसणारे तुकतुकीत अद्रक बाजारातून विकत घेतात. तुम्हाला याची माहिती असलीच पाहिजे की अनेक विक्रेते आले विकताना ते स्वच्छ करण्यासाठी ऍसिडचा वापर करतात.
The post बाजारातील ‘हे’ बनावट आले तुमचे आरोग्य बिघडवू शकतात ; या प्रकारे ओळखा असली-नकली appeared first on Dainik Prabhat.