
बनावट ऍप अशी घ्या खबरदारी
July 7th, 3:07pmJuly 7th, 3:07pm
प्रभात वृत्तसेवाlatest-news
स्मार्टफोनमध्ये अनेक ऍप्स असतात. मात्र ऍप वापरताना खबरदारी घ्यावी. कारण बरेच ऍप्स बनावट असतात. त्यामुळे तुमची फसवणूक होऊन नुकसानही होते. आजकाल बनावट ऍप्सच्या माध्यमातून तुमचा डाटा हॅक केला जातो, चोरला जातो, आर्थिक फसवणूकही केली जाते. अशावेळी खूप सावधानतेने तुम्हाला हवा असलेलाच ऍप डाउनलोड करताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
गूगल प्ले स्टोअरवरून ऍप डाउनलोड करताना तुम्हाला हवे असलेलेच ऍप आहे ना याची खात्री करा. त्यासाठी स्पेलिंग नीट वाचा. कारण जवळपास सारखेच स्पेलिंग वाटतात अशी बनावट ऍप्स उपलब्ध आहेत. ऍप्सचा रिव्ह्यू, रेटिंग्ज आणि डाउनलोड पाहा. ऍपबद्दलची सर्व माहिती मिळेल. ऍपचे रिव्ह्यू वाचा.
त्यामुळे तुम्हाला रिव्ह्युबाबत फिडबॅक मिळेल. डाउनलोड करीत असलेले ऍप नेहमीपेक्षा अधिक माहिती विचारत असेल तर माहिती भरण्याअगोदर पुन्हा एकदा ऍप बनावट नाही ना याची खात्री करा. तुम्हाला खात्रीशीर ऍप डाउनलोड करून हवे असल्यास ब्राउझरमधील स्टोअर वेबसाइटला भेट देऊन गेट अवर ऍप हा पर्याय निवडा. येथे अधिकृत ऍप डाउनलोड करता येतील.