Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

फॅमिली हिस्ट्री आणि स्तनाचा कर्करोग, जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात…

by प्रभात वृत्तसेवा
August 2, 2021
in आरोग्य वार्ता
A A
फॅमिली हिस्ट्री आणि स्तनाचा कर्करोग, जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

एखाद्या महिलेला कर्करोगाची फॅमिली हिस्ट्री नसेल तर तिला स्तनाच्या कर्करोगाचा धोका असतो का ?  काही कुटुंबात असं पाहिलं जातं की आईला ब्रेस्ट कॅन्सर होता, आणि आता मुलीला देखील झाला आहे ? याचं काय कारण असतं ? ……यासारख्या अनेक महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा विख्यात ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ. प्रांजली गाडगीळ यांच्यासह दैनिक प्रभातने साधलेल्या विशेष संवाद मालिकेचा सातवा भाग…

प्रश्न क्र.(1)  एखाद्या महिलेला कर्करोगाची फॅमिली हिस्ट्री नसेल तर तिला स्तनाच्या कर्करोगाचा धोका असतो का ?

उत्तर –  ८५ % ब्रेस्ट कॅन्सर हे अनुवांशिक असे नसतात. म्हणजे एखाद्या महिलेला जेव्हा स्तनाचा कर्करोग होतो, तेव्हा बहुतेक वेळेस कर्करोग असलेली ती कुटुंबांमधील पहिलीच व्यक्ती असते. हा एक मोठा गैरसमज आहे कि जवळच्या नातलगांना कुणाला कर्करोग झाला नसेल तर मी या आजारापासून सुखरूप राहीन. त्यामुळे कोणतीही स्तनाची तक्रार असेल तर मला फॅमिली हिस्ट्री नाही, म्हणजे कर्करोग नसणार अशा भ्रमात राहू नये – डॉक्टरांचा सल्ल्ला घेण्यात दिरंगाई करू नये.

प्रश्न क्र.(2)  काही कुटुंबात असं पाहिलं जातं की आईला ब्रेस्ट कॅन्सर होता, आणि आता मुलीला देखील झाला आहे ? याचं काय कारण असतं ?

उत्तर – अंदाजे ५-१० % स्तन-कर्करोगाच्या केसेस या अनुवांशिक जेनेटिक डिफेक्ट मुळे होतात. बहुतेक अनुवांशिक ब्रेस्ट कॅन्सर हे B.R.C.A १ आणि B.R.C.A २ या जीन्स च्या दोषांमुळे होतात. आणि हे जीन्स फक्त आईकडून मुलांमध्ये येतात असं नाही. ५०% जीन्स हे वडिलांकडून येतात त्यामुळे – वडिलांकडच्या नातलगांची हिस्ट्री देखील तितकीच महत्त्वाची असते.

ज्या महिलांमध्ये B.R.C.A जीन चा दोष आढळतो, त्यांना कर्करोग होण्याची शक्यता सामान्य महिलांपेक्षा खूप जास्त असते. आयुष्यात कधीतरी स्तनाचा कर्करोग होण्याची ६०-८०%% टक्के तर अंडाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता ४०-६०%इतकी असू शकते.
तुम्ही म्हणाल्या प्रमाणे जर एके कुंताबातल्या अनेक सदस्यांना कॅन्सर असेल तर त्यांना जेनेटिक कोणसेल्लिंग करून जेनेटिक टेस्टिंग करवण्याचा सल्ला दिला जातो.

प्रश्न क्र.(3) जेनेटिक टेस्ट ही कशी केली जाते – आणि टी कोणी केली पाहिजे ?

उत्तर –अनुवांशिक असे जेनेटिक डिफेक्टस हे शरीराच्या सर्व पेशींमध्ये असतात त्यामुळे रक्ताच्या किंवा थुंकीच्या सॅम्पल वर या तपासण्या होऊ शकतात. पण ही अशी तपासणी नाही की ” पुढच्यावेळी हेमोग्राम वगरे करतांना एक जेनेटिक टेस्ट देखील करूया “. जेनेटिक टेस्टिंग या शास्त्राचा अभ्यास करून त्यात अनुभव घेतलेल्या ऑनकॉलॉजिस्ट ब्रेस्ट सर्जन, किंवा जेनेटिक कॉऊन्सेलर्स च मार्गदर्शन घेऊन त्यांच्या सल्ल्याने या तपासण्या केल्या गेल्या पाहिजेत.

टेस्ट करण्या अगोदर “pre -test ” कॉउंसेल्लिंग केले जाते. हा एक प्रकारचा मेडिकल interview असतो. तुमची मेडिकल हिस्टरी, तुमच्या कुटुंबीयांची मेडिकल हिस्टरी, याचा सखोल अभ्यास केला जातो. या वरून एखाद्या व्यक्तीमध्ये जेनेटिक दोष असण्याची किती शक्यता आहे, याचा अनुमान बांधला जातो. टेस्ट मध्ये हा दोष सापडला, तर कॅन्सर पासून मुक्त राहण्यासाठी काय- काय करता येईल हे समजावून दिले जाते. टेस्टिंग चे फायदे, मर्यादा काय असू शकतात याची चर्चा केली जाते.
टेस्टिंग करायचं का नाही याचा निर्णय patient नी घ्यायचा असतो. टेस्ट करायची ठरली की,
रक्ताच्या किंवा थुंकीच्या सॅम्पल वर या तपासण्या होऊ शकतात.

जेनेटिक लॅब मध्ये सॅम्पल गेलें की -आधी त्यातून D.N.A चा भाग वेगळा केला जातो, मग त्यातील जीन्स चे सिक्वेन्सिंग करून, त्यांचा अभ्यास केला जातो. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून , त्याची तुलना उपलब्ध विज्ञानाशी करून रिपोर्ट बनविला जातो . ही प्रक्रिया पूर्ण करण्यास ४-८ अधवडे लागू शकतात.
टेस्ट चा रिपोर्ट आल्यानंतर परत ” post- test” कॉऊंसेल्लिंग देखील केले जाते ज्यात तुम्हाला रिपोर्ट समजावून दिला जातो.

प्रश्न क्र.(4) तुमच्या केंद्रात हे जेनेटिक कोणसेल्लिंग – टेस्टिंग केलं जातं – तर तुम्ही या तपासण्या करण्याचा सल्ला कोणाला देता?

उत्तर – दोन गट आहेत ज्यांच्यात हे टेस्टिंग केलं जातं . ज्या महिलांना किंवा पुरुषांना स्वतःला कॅन्सर झाला आहे अशी व्यक्ती. ज्यांना स्वतःला कॅन्सर नाही आहे, पण ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे अश्या व्यक्ती.

प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सर च्या रुग्णांनी जेनेटिक टेस्टिंग ची माहिती करून घ्यावी. असा मी सल्ला देते. काहीतरी अनुवांशिक दोष असण्याचा संशय कधी येतो ? तर तरुण वयात विशी तिशी मध्ये उद्भवणारा ब्रेस्ट कॅन्सर असेल. एकाच महिलेला दोन्ही स्तनांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल. ट्रिपल निगेटिव्ह ” प्रकारच्या ब्रेस्ट कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या महिलेच्या जवळच्या नातलगांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर ,ovary चा कॅन्सर असेल, पुरुषाला कोणाला ब्रेस्ट कॅन्सर असेल प्रॉस्टेट चा कॅन्सर असेल. सहसा अशा केसेस मध्ये कॉऊंसेल्लिंग करून टेस्टिंग चा सल्ला दिला जातो. ही टेस्ट उपचार चालू असताना करता येते किंवा उपचार पूर्ण होऊन बराच अवकाश झाला असेल अशा केसेस मध्ये सुद्धा करता येते.
ही टेस्ट करून जर असा जेनेटिक दोष सापडला तर – ज्या महिलांची ट्रीटमेंट चालू असेल, त्यांचा उपचारांमध्ये फरक पडू शकतो. chemotherapy ची काही औषध अशी आहेत कि BRCA positive केसेस मध्ये ती जास्त प्रभावशाली आहेत.

प्रश्न क्र.(5) एखाद्या महिलेला हे B .R.C.A. mutation असल्याचे समजले, पण तिला कॅन्सर झाला नसेल तर काय करावे ?

उत्तर – जेनेटिसिस्ट व ऑनकॉलॉजिस्ट बरोबर बसून ही माहिती समजवून घेतली पाहिजे. कर्करोग होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे, आम्ही या महिलांना दर सहा महिन्याला तपासणी साठी बोलावतो. मॅमोग्राफी आणि ब्रेस्ट M.R.I या चाचण्या दार सहा महिन्यात आलटून पालतून केल्या जातात. या व्यतिरिक्त महिलेला स्वतःची स्तनपरीक्षा घरच्याघरी कशी करावी हे शिकविले जाते. असे केल्याने कर्करोग टाळता येत नाही पण त्याचे निदान प्राथमिक अवस्थेत होऊ शकते आणि जीवाला धोका टळू शकतो.

बहुतेक महिलांना पप्रिव्हेंटिव्ह मस्तकेटॉमी चा सल्ला दिला जातो. या शस्त्रक्रियेच्या वेळी इम्प्लांट किंवा फ्लॅप वापरून नवीन स्तनाचा निर्माण केला जातो. या प्रक्रियेला “Immediate Reconstruciton” असं म्हणतात. या शस्त्रक्रियेनंतर स्तनाच्या कर्करोगाची शक्यता अगदी कमी होते. ज्या महिलांना शस्त्रक्रिया पटत नाही किंवा करणे सोईस्कर सते, त्यांना कॅन्सर ची शक्यता कमी करण्यासाठी औषधे दिली जातात, ज्यांचा काही फायदा होऊ शकतो.
ओव्हरीच्या (अंडाशयाचा) कॅन्सर साठी वार्षिक पेल्विक सोनोग्राफी आणि ट्यूमर मार्कर्स च्या रक्ताच्या तपासण्या केल्या जातात. पण अंडाशयाचा कॅन्सर जेव्हा प्राथमिक अवस्थेत असतो तेव्हा त्याची काही लक्षणे महिलेला जाणवत नाहीत, आणि निदान सहसा प्रगत अवस्थेत होते. म्हणूनच ज्या B.R.C.A पॉसिटीव्ह महिलांचे कुटुंब पूर्ण झाले असेल, त्यांना शस्त्रक्रिया करून ट्यूब्स आणि ओव्हरीज काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो.

प्रश्न क्र.(6) आपल्याला कॅन्सर झाला नसताना, महिला प्रेव्हेंटिव्ह सर्जरी साठी तयार होतात का ?

उत्तर –सहसा ज्या महिला आमच्याकडे जेनेटिक कॉउंसेल्लिंग आणि टेस्टिंग साठी येतात, त्यांनी आपल्या अनेक नातेवाईकांमध्ये कॅन्सर चा आजार जवळून पाहिलेला असतो. आजार, त्याच्या उपचारातून झालेला त्रास आणि अनेकदा कॅन्सर ने झालेली जीव हानी ही त्यांना माहितीची असते. आपल्या मध्ये जर अनुवांशिक असा जेनेटिक दोष असेल आणि ती माहिती जर आधीच कळाली तर आपण स्वतःचा बचाव करू, या विचाराने महिले टेस्ट करतात. जर एखाद्या शस्त्रक्रियेमुळे कॅन्सर टाळता येत असेल, तर ती आधी करावी, म्हणजे नंतर केमोथेरपिटी रेडिएशन इत्यादी ट्रीटमेंट आणि जीवाला हानी टाळता येईल, अशा विचाराने शस्त्रक्रिया केली जाते. पण हे सर्व समजून घेऊन योग्य निर्णय घ्यायला जेनेटिक कोऊन्सेलिंग महत्वाचे असते.

प्रश्न क्र.(7) पालकांमध्ये हा जेनेटिक डिफेक्ट सापडला तर मुलांची चाचणी कधी करावी ?

उत्तर – हे कॅन्सर्स सहसा लहान मुलांना होत नाहीत. म्हणूनच चाचणीची पूर्ण माहिती घेऊन, फायदे तोटे समजून घेऊन, ही टेस्ट आपण करावी कि नाही हे मुलांना स्वतः ठरवता यायला पाहिजे. या साठी अठरा वर्षानंतरच जेनेटिक कोणसेल्लिंग सुचविले जाते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar