Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

फिटनेस : मुलामुलींची उंची

by
April 20, 2023
in फिटनेस
A A
फिटनेस : मुलामुलींची उंची
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवजात बालकाची सरासरी लांबी 50 सें.मी. मानली जाते. वयाच्या पहिल्या वर्षी महिन्याला 2 सें.मी. अशा वेगाने उंची 25 सें.मी. वाढून एका वर्षाच्या बाळाची लांबी 75 सें.मी. इतकी होते. दुसऱ्या वर्षी महिन्याला 1 सें.मी. या वेगाने 12 सें.मी. वाढते. 2 वर्षे ते 12 वर्षे या वयात (पौगंडावस्था सुरू होईपर्यंत) उंची दरवर्षी 6 से.मी.ने वाढते.

उंची ही पूर्णपणे अनुवंशिक असते आणि आई-वडिलांची उंची कमी असेल तर मुलांची उंची कमीच राहते, हा समज थोड्या प्रमाणात खरा आहे. कुपोषणामुळे मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. कुपोषण नुकतेच सुरू झाले असेल तर वजन वाढायचे थांबते; पण मूल दीर्घकाळ कुपोषित असेल तर वजन आणि उंची या दोन्हीवर परिणाम होतो.

उंचीने कमी असलेल्या मुलाचे वजन त्याच्या उंचीला साजेसे असेल तर ते केवळ खुजे (बुटके) समजावे; कुपोषित नव्हे. उंची कमी-जास्त असणे हे बहुतेक वेळा पायांची लांब हाडे आणि पाठीच्या कण्यांची लांबी या दोन गोष्टींवर ठरते. पाठीचा कणा मानेतील 7, छातीच्या 12 आणि कमरेच्या 5 मणक्‍यांचा बनलेला असतो. पाठीच्या कणाच्या लांबीची उंची वाढविण्यात महत्त्वाचा भाग नसतो; पण आहे ती उंची कमी दिसण्यात किंवा होण्यात मणक्‍यांची रचना महत्त्वाची ठरते.

उंचीचा विचार करताना, मांडीचे हाड (फिमर) आणि पायातले गुडघ्याखालचे हाड (टायबिया) महत्त्वाचे ठरते. या हाडांच्या टोकाजवळ असणारा भाग (मेटाफिसिस) किती कार्यक्षम राहतो यावर हाडांची लांबी (व्यक्‍तीची उंची) ठरते.
मुलांच्या वाढीचे तीन खंड पडतात. या तीनही कालखंडात विविध घटकांचा उंची वाढविण्याशी संबंध असतो. अगदी बाल्यावस्थेत म्हणजे दोन वर्षापर्यंत समतोल आहार (पोषण हाच उंचीवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पहिल्या दोन वर्षात पोषण कमी पडले तर त्याचे दूरगामी परिणाम होतात. दोन वर्षांच्या शेवटी मुलांची उंची सरासरीपेक्षा 2-3 इंच कमी असली तर ती भरून काढता येत नाही. पुढील वाढीमध्ये ही तूट कधीच भरून काढता येत नाही.

या पुढच्या अवस्थेत आहाराबरोबरच ग्रोथ हार्मोन्स आणि थायरॉक्‍सिन या दोन संप्रेरकांचा उंचीवर सर्वाधिक परिणाम होतो. हे दोन्ही कमी प्रमाणात तयार झाल्यास उंची खुंटते. ग्रोथ हार्मोन झोपेमध्ये रक्‍तात सोडले जाते. वाढ चांगली होण्यासाठी चांगली, झोप, पुरेसा व्यायाम आणि मानसिक शांततेची नितांत गरज असते.

ज्या मुलांच्या घरी वातावरण अस्थिर असते, त्यांची उंची खुंटते. थायरॉइड ग्रंथीचे आजार मुलींमध्ये विशेष करून आढळतात. तिसऱ्या म्हणजेच पौगंडावस्थेत उंची वाढविणारा सर्वात मोठा घटक म्हणजे सेक्‍स हार्मोन्स. वयात आल्यानंतर मुला-मुलींची उंची झपाट्याने वाढते. मुलांपेक्षा मुली दोन वर्षे लवकर वयात येतात. त्यामुळे मुलींची सरासरी उंची लवकर वाढते आणि लवकर थांबते. यामुळे 10-11 वर्षांची मुलगी 12-13 वर्षांपेक्षा तिच्या दादापेक्षा उंच झाल्याचे आपण पाहतो. मुलींच्या बाबतीत वयात येणाच्या क्रियेचा एक ठराविक क्रम असतो. पाळी सुरू झाली की, वयात येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असा अर्थ होतो.

उंची वाढण्याकरिता लागणारी चांगल्या प्रतीचे प्रथिने, योग्य प्रमाणात ऊर्जा, कॅल्शियम, जीवनसत्त्व “अ’, “ड’, क’, फॉस्फरस, लोह आहारातून मिळणे आवश्‍यक आहे. सर्व तृणधान्ये, डाळी, उसळी, पालेभाज्या, शिरांच्या भाज्या, दूध, दही योग्य प्रमाणात लोणी, तूप, तेल यांचा वापर, पिकलेली ताजी फळे आणि शेंगदाणे यांचा आहारात समावेश आवश्‍यक आहे.

=======================

The post फिटनेस : मुलामुलींची उंची appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar