आजकाल फास्ट जीवनशैली मुळे अनेकांना शरीरावर विपरीत परिणाम होताना दिसतो. सक्सेस होण्यासाठी काळासोबत धावणे योग्य आहे पण उत्तम आरोग्यसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आरोग्य उत्तम नसेल तर काळासोबत धावताना आपण कुठेतरी मागे पडत असतो आणि कामाच्या व्यापात वेळेअभावी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व याचा परिणाम शरीरातील नको त्या शरीराच्या पार्टवर कॉलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू लागते आणि आपले वजन वाढते मोटापाला सामोरे जावे लागते.
वजन वाढल्यामुळे मोटापामुळे अनेक व्यक्ती डिप्रेशनमध्येसुद्धा येतात मोटापामुळे मनस्थितीत कमकुवत होते चार चौघात मिसळताना थोडे लाजिरवाणे ही वाटते हे सगळे टाळण्यासाठी नेहमीच्या कामाच्या रुटीन सोबत डाएट प्लान करणे महत्त्वाचे असते. डायट प्लान ठरवताना रोजच्या आहारात योग्य खाद्यपदार्थांचे सेवन करून वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. कॅलरीज अकाउंट करून वजन कमी करता येते.
वजन कमी करणे आपल्याला जितके कठीण वाटते तितके नाही. वजन कमी करणे हे आपल्याच हातात असते. डायट प्लान बनवून आपण इझी वजन कमी करू शकतो. वजन कमी करण्यासाठी 80 टक्के योग्य संतुलित आहार व 20 टक्के एक्सरसाइज केल्याने वजन कमी होते. कॅलरीज वर विशेष लक्ष दिले पाहिजे एका योग्य संख्येत कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेत.
तज्ज्ञांनुसार कॅलरीच्या मिश्रणाला संतुलित ठेवणे वजन कमी करण्यास सर्वात जास्त मदत होते रोज आपल्याला किती कॅलरीचा वापर आणि किती कॅलरीज बर्न करायला पाहिजेत याची माहिती न्यूट्रिशियन डॉक्टरांना भेटून घ्यावी. सुमारे एका दिवसाला सोळाशे कॅलरीज लागतात.
कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फुड यापासून कॅलरी मिळतात त्यामुळे यांचे बॅलन्स ठेवणे गरजेचे असते. सकाळी लवकर उठल्यावर एक ग्लास पाणी मध्ये अर्धा लिंबूचा रस पिळून हे मिश्रण सीप बाय सीप हळूहळू ज्यूस प्रमाणे प्यावे. लिंबू मध्ये विटामिन सी असते. यामुळे पूर्ण बॉडी चे टॉक्झीन साफ करते टॉक्झीन साफ झाल्यामुळे आपोआपच वजन घटयला लागते आणि इम्युनिटी पावर देखील वाढवते.डायबिटीस पेशंट असले तर लिंबू पाण्यात एक चमचा मध टाकून पिऊ शकतात यामुळे एनर्जी मिळू शकेल व दिवसभर दुरुस्त वाटेल.
सकाळी सकाळी उठल्यावर चहा पिऊ नये बऱ्याच जणांना सकाळी चहा पिण्याची सवय असते पण यामुळे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो व हार्ट प्रॉब्लेमचा धोका उद्भवू शकतो चहा पिल्यावर पोट साफ होत नाही. चहा मध्ये कॅफिन असते . शरीराला घातक असल्यामुळे चहा पिणे शक्यतो टाळावे. ग्रीन टी घेऊ शकता.
सकाळी ब्रेकफास्ट करताना फायबर युक्त पदार्थ सेवन करावे. त्यात ओट्स, खीरा, काकडी गाजर , सिमला मिरची, सिजनेबल पालेभाज्या, टमाटा दलिया चे मिश्रण घेऊन सॅलड बनवून खावे. ड्राय फ्रुट्स खावे हे वजन वाढू देत नाहीत.
दुपारच्या जेवणात अंकुरित पदार्थ, गाजर, मटर, मूग ची कोणत्याही प्रकारचे बीन्स खावे . भाजीसोबत एक ते दोन चपाती खावे.
रात्रीच्या जेवणात दाळ, लौकीची भाजी आणि एक पोळी घ्यावी. सूप, व हलका फुलका आहार घ्यावा.
जेवण कधीही उभे राहून करू नये. जेवण करताना बोलू नये. हवा तोंडात जाते. भगवंताच्या नामस्मरणाने जेवणाला सुरुवात करावी. यामुळे जेवणात सात्विकता येते . लस्सी पनीरसारखे दुधाचे पदार्थ कमी खावे यात जास्त प्रमाणात कॅलरीज असतात यामुळे मोटापा होऊ शकतो. आहारात फ्रुट्स घ्यावे यामुळे डायजेशन सुधारते अँटिऑक्सिड मिनरल्स असतात. तळलेले पदार्थ खाऊ नये.जितकेही फिल्म स्टार सेलिब्रिटी आहेत ते प्रत्येकी दोन तीन तासात काही ना काही हेल्दी पदार्थ सेवन करतात म्हणून ते स्वतःला इतके फिट ठेवू शकतात.
The post फिटनेस : बारीक व्हा शिस्तीत..! appeared first on Dainik Prabhat.