Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

फिटनेस : गृहिणींसाठी योगासने

by
August 15, 2023
in फिटनेस
A A
फिटनेस : गृहिणींसाठी योगासने
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

उत्तम आरोग्यासाठी योगासने सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि पुरुषांपासून महिलांपर्यंत नियमितपणे योगाभ्यास केला पाहिजे. मात्र, दैनंदिन कामामुळे बहुतांश महिलांना स्वत:साठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे महिलांना लठ्ठपणा, रक्तदाब, शुगर, थायरॉईड, गुडघेदुखी अशा समस्या होतात. अशा परिस्थितीत महिलांना भेडसावणाऱ्या या सर्व समस्यांवर योग हा कायमस्वरूपी उपाय आहे. या शारीरिक समस्यांपासून दूर राहण्यासाठी आणि स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरातील व्यस्त वेळेतून स्वत:साठी वेळ काढून काही योगासने करा. येथे तुम्हाला अशाच काही योगासनांविषयी सांगितले जात आहे जे गृहिणींसाठी फायदेशीर आहेत.

सुप्त वज्रासन
या योगासनांमुळे शरीर लवचिक बनते. या योग आसनाच्या सरावाने मानसिक शांती मिळते आणि तणाव कमी होतो. सुप्त वज्रासन करण्यासाठी, वज्रासन स्थितीत जमिनीवर बसून, श्‍वास घ्या आणि आपले दोन्ही हात डोक्‍याच्या वर सरळ करा. आता श्वास सोडताना पुढे वाकवा. आपले तळवे आणि डोके जमिनीवर ठेवून दीर्घ श्‍वास घ्या आणि श्‍वास सोडा. हाताची बोटे एकत्र ठेऊन डोके हलक्‍या हाताने दोन तळहातांमध्ये ठेवावे. काही वेळाने जुन्या स्थितीत परत या.

धनुरासन
धनुरासनामुळे स्त्रियांचे मासिक पाळीचे विकार दूर होतात. या आसनाने स्नायूंना चांगला ताण येतो. त्यामुळे पोटाची चरबी कमी होते. धनुरासन करण्यासाठी पोटावर झोपावे, गुडघे वाकवावे आणि पायाचे घोटे तळहातांनी धरावेत. आता तुमचे पाय आणि हात शक्‍य तितके उंच करा. वर पाहताना, काही वेळ या पोझमध्ये रहा आणि नंतर सामान्य स्थितीत या. ही प्रक्रिया पुन्हा करा.

सुखासन
सुखासनाचा सराव मानसिक आणि शारीरिक शांतीसाठी उपयुक्त आहे. योगासन सुरू करण्यापूर्वी हे आसन केले जाते. जेणेकरून श्वास घेण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवता येईल. हे आसन करण्यासाठी जमिनीवर पाय रोवून बसा आणि दोन्ही डोळे बंद करा आणि तळवे गुडघ्यावर ठेवा. मग दीर्घ श्वास घ्या. ही प्रक्रिया पुन्हा करा.

The post फिटनेस : गृहिणींसाठी योगासने appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar