हे दंडस्थितीतील आसन आहे. त्याचप्रमाणे आपण शयन आणि विपरित शयनस्थितीतही वृक्षासन करू शकतो. वृक्ष म्हणजे झाड. या आसनाची झाडाप्रमाणे कल्पना केलेली आहे. हे दंड स्थितीमधील, म्हणजेच उभ्याने करण्याचे तोलात्मक आसन आहे.
प्रथम दोन्ही पायांत थोडेसे अंतर घेऊन उभे राहावे.
हाताच्या आधाराने डावा पाय गुडघ्यात वाकवून हळूहळू वर घ्यावा
पायाचा तळवा उजव्या मांडीच्या आतल्या बाजूला टेकवावा.
पाय स्थिर राहिल्यावर दोन्ही हात श्वास घेत बाजूने वर घ्यावे. नमस्कार स्थितीमध्ये असावे.
दोन्ही कोपरे ताठ असावेत. दोन्ही दंड दोन्ही कानांना टेकलेले असावेत.
अशा पद्धतीने एकदा डावा पाय आणि एकदा उजवा पाय वर घेऊन आपण अर्ध वृक्षासन करू शकतो.
आसन सोडताना सावकाश पाय जागेवर घ्यावेत.
श्वास सोडत हात जागेवर घ्यावेत.
वृक्षासनाचे फायदे
उंची वाढविण्यासाठी 14 वर्षांच्या पुढील मुला-मुलींना वृक्षासन रोज नियमित करवून घेतले असता योगप्रयोगांती त्यांची उंची वाढली असल्याचे सिद्ध झाले आहे म्हणून शाळेमध्ये हे आसन रोज घेतले जाणे गरजेचे आहे. या आसनामुळे मनाची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते. चिडचिड कमी होते, आकलनक्षमता वाढण्यास मदत होते. ताणतणाव घालवण्यासाठी, आपले हातापायांचे मजबुतीसाठी, उत्तम रक्ताभिसरणासाठी, नेत्रदोष जाण्यासाठी, शरीर आणि मनाचा समतोल राखण्यासाठी तसेच आपले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करण्यासाठी वृक्षासन नियमित करावे.
The post फिटनेस : आत्मविश्वासाठी वृक्षासन appeared first on Dainik Prabhat.