Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

फक्त नाश्त्याची वेळ बदला आणि वजन सहज घटवा ! – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
July 7, 2022
in आरोग्य वार्ता
A A
फक्त नाश्त्याची वेळ बदला आणि वजन सहज घटवा ! – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पोटाची अतिरिक्त चरबी किंवा वजन वाढले की लोक अस्वस्थ होतात. जास्त वजनामुळे अनेक प्रकारचे आजार होतात, तर लठ्ठपणामुळेही लोकांमध्ये आत्मविश्वास कमी होतो. आजकाल प्रत्येकाला स्लिम आणि हेल्दी दिसण्याची इच्छा असते. पण आजच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, खाण्यापिण्याच्या विचित्र सवयींमुळे लोकांचे वजन वाढू लागते आणि पोटाची चरबी दिसू लागते. वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी लोक योग, व्यायाम आणि आहार इत्यादी अनेक प्रयत्न करतात. नियमित योगाभ्यास किंवा व्यायामाचाही काही परिणाम होतो. वजन बर्‍याच प्रमाणात कमी होते, पण जर तुम्ही व्यायाम करणे किंवा योगासने करणे बंद केले तर वजन पुन्हा वाढू शकते. अशा परिस्थितीत खूप मेहनत करूनही पोटाची चरबी कमी होत नाही. त्यामुळे कष्ट न करता योग्य वेळी नाश्ता करून वजन कमी करता येते. तज्ज्ञांच्या मते, नाश्त्याची वेळ बदलून लोक पाच किलोपर्यंत वजन कमी करू शकतात. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी नाश्ता कोणत्या वेळी करायला हवे ?

– नाश्ता करण्याची योग्य वेळ
पूर्वी लोकांची सकाळ लवकर सुरू व्हायची आणि सूर्य मावळला की अंधार पडून रात्र सुरू व्हायची. लोक सकाळी लवकर नाश्ता करायचे आणि सूर्यास्त होईपर्यंत रात्रीचे जेवण करायचे. रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यात खूप अंतर होते. तज्ज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये किमान 14 ते 16 तासांचे अंतर ठेवल्याने लोक निरोगी आणि तंदुरुस्त राहतात.

-नाश्ता आणि रात्रीच्या जेवणादरम्यान अंतर
मात्र, आजच्या बदलत्या आणि बिघडलेल्या जीवनशैलीत लोकांच्या खाण्यापिण्याच्या वेळाही बिघडल्या आहेत. लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि काहीतरी खात राहतात. दुसरीकडे, सकाळी कॉलेज किंवा ऑफिसमुळे ते एकतर नाश्ता न करता बाहेर पडतात किंवा सकाळीच काहीतरी खातात. यामुळे त्यांच्या रात्रीचे जेवण आणि नाश्ता यात अंतर राहत नाही. त्यामुळे पोटाची चरबी वाढू लागते.

– अधूनमधून उपवास (इंटर्मिटेंट फास्टिंग) म्हणजे काय?
तज्ञ लोकांना अधूनमधून उपवास करण्याची शिफारस करतात. यामध्ये रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये जास्त अंतर ठेवावे लागते. यासाठी न्याहारीची वेळ बदलून सकाळी 11 ची करा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. किंग्स कॉलेज लंडनमधील जेनेटिक एपिडेमियोलॉजीचे प्रोफेसर म्हणतात की वजन कमी करण्यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत काहीही खाऊ नये अथवा नाश्ता करू नये.

-14 तास उपवास
एका संशोधन अहवालात असे म्हटले आहे की रात्रीचे जेवण लवकर केल्यानंतर, तुम्ही सकाळच्या नाश्त्यादरम्यान किमान 14 तास उपवास केला पाहिजे. जर रात्रीच्या जेवणाची वेळ रात्री 8 किंवा 9 वाजता असेल तर सकाळी 11 वाजता नाश्त्याची वेळ ठेवा. सकाळी एवढा उशिरा नाश्ता करायचा नसेल तर संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत जेवण करा. एकूण, तुम्हाला सुमारे 14 तासांचा उपवास ठेवावा लागेल. यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते आणि शरीर डिटॉक्स होते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar