मुंबई : सध्या व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि या दिवसात लाखो लोक एकमेकांना ‘लव्ह यू’ म्हणतील. पण तुम्हाला माहीत आहे का ‘लव्ह’ (Love) अर्थात प्रेम हा शब्द कुठून आला? चला तर, आपल्या मनातल्या जोडीदाराला ‘आय लव्ह यू’ म्हणण्याआधी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
इंटरनॅशनल स्कूल ऑफ एज्युकेशन नावाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जुन्या इंग्रजीच्या ‘लुफू’ या शब्दावरून प्रेम हा शब्द तयार झाला आहे. लुफू म्हणजे खोल आपुलकी. मात्र हा लुफू शब्दही मूळ इंग्रजी शब्द नाही. हा शब्द पर्शियन शब्द ‘लुवे’ तसेच जुन्या जर्मन शब्द ‘लुबा’ वरून आला आहे.
* प्रपोज करण्याची परंपरा कुठून सुरू झाली?
वास्तविक, प्रथम प्रपोज कोणी मांडलं, हे कुठेही ठोस लिहिलेले नाही. मात्र, पहिल्यांदा प्रपोज करताना जे चित्र जगासमोर आले ते 1925 साली आले, जेव्हा ‘सेव्हन चान्सेस’ या इंग्रजी चित्रपटाचा कॉमिक अभिनेता बस्टर कीटन त्याच्या नायिकेसमोर गुडघे टेकून आपले प्रेम व्यक्त करत होता. तो एक मूकपट होता. यानंतर गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याची परंपरा आधी युरोपात व नंतर संपूर्ण जगात सुरू झाली, असं म्हणतात.
* ‘लव्ह’ या शब्दाचा वापर कोठून सुरू झाला?
जर आपण अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे पाहिली तर, 1423 च्या आसपास, लोकांनी एखाद्यावर प्रेम दाखवण्यासाठी ‘लव्हसिक’ हा शब्द वापरल्याचे दिसून येईल. त्याच वेळी, 1919 च्या सुमारास लोक ‘लव्ह लाईफ’ सारखे शब्द वापरू लागले. त्यानंतर सर्रास सगळीकडेच ‘लव्ह’ हा शब्द वापरला जातोय.
The post प्रेमीजनांसाठी अत्यंत महत्त्वाचा ‘लव्ह’ (Love) शब्द कुठून आला ? appeared first on Dainik Prabhat.
