[[{“value”:”
नवी दिल्ली – 29 सप्टेंबर रोजी जगात सर्वत्र जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने हृदयविकाराच्या बाबतीत नवनवीन गोष्टी समोर आल्या होत्या आता हृदयविकार आणि प्रेमभावना यांचा थेट संबंध असल्याचे लक्षात आले असून प्रेम भावनेमुळे हृदय मजबूत होते आणि प्रेमातील ब्रेकअप मात्र हृदय विकाराला कारणीभूत ठरू शकतो हृदयाच्या आरोग्यावर दैनंदिन जीवनातील आणि जीवनशैलीतील अनेक घटक परिणाम करत असले तरी प्रेमाचा थेट संबंध हृदयविकाराशी असू शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे.
हृदय विकार तज्ञ डॉक्टर समीर दाणी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आपल्या प्रेमातील भागीदार जेव्हा आपल्या आसपास असतो आणि नेहमी सहवासात असतो त्या कालावधीमध्ये आपण आनंदी आणि समाधानी असतो त्यामुळे हृदयही त्यावेळी चांगल्या प्रकारे कार्यरत असते या सुखा समाधानाच्या कालावधीमध्ये रक्तदाब कमी राहात असल्यामुळे आपोआपच हृदयाचे आरोग्यही चांगले राहते उलट प्रेमभंग झाला तर त्याचा नकारात्मक परिणाम शरीर स्वास्थ्यावर आणि हृदयाच्या आरोग्यावरही पडू शकतो वैद्यकीय भाषेमध्ये याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम असे म्हटले जाते.
प्रेमभंग झाल्यावर जी मानसिक परिस्थिती निर्माण होते त्याच्याशी योग्य सामना केला नाही तर रक्तदाब वाढणे आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे हृदयाचे आरोग्य बिघडू शकते ब्रोकन हार्ट सिंड्रोमचा सर्वात जास्त धोका महिलांना आहे प्रेमातील ब्रेकअप मुळे मानसिक ताणतणाव वाढत असतात त्याचा परिणाम डिप्रेशनचा विकार जडण्यावर ही होऊ शकतो मानसिक ताण डिप्रेशन रक्तदाब कमी जास्त होणे याचा एकत्रित परिणाम म्हणून हृदयाचे आरोग्य बिघडू शकते प्रेमसंबंधांमुळे एका बाजूला सुख आणि समाधानाचे आयुष्य जगत असताना हृदयाचे आरोग्य सुधारत असली तरी दुसरीकडे प्रेमभावनेत बिघाड झाला तर हृदयाचे आरोग्यही बिघडू शकते त्यामुळे अशा परिस्थितीत या तणावाचा कसा सामना करायचा याबाबत मार्गदर्शन घेण्याची गरजही तज्ञांनी व्यक्त केली आहे.
The post प्रेमभावना करते हृदयाला मजबूत appeared first on Dainik Prabhat.
“}]]