देशात भले आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत घसरण झाली आहे. मात्र विषाणूचा मृत्यूदर कमी झालेला नाही. तसेच रुग्णांचे प्रमाण कमी झाले म्हणून कोरोना संपला असे समजून चालणार नाही. आपणाला हयगय करून चालणार नाही. आरोग्याची पुरेशी काळजी घेणे ही नितांत गरज आहे.
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला विचारात घेतल्यास आपल्याला कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूशी लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मजबूत करावी लागणार आहे. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटी पॉवर कमजोर आहे, त्या लोकांवर विषाणू हल्ला करण्याची शक्यता असते.
तुम्ही अनेक नैसर्गिक उपायांच्या माध्यमातून तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करू शकता. याच विविध उपायांमध्ये एक रामबाण उपाय म्हणजे तुळशी आणि काळी मिरीचा काढा. हा काढा पिण्यामुळे तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढेल अर्थात तुम्ही कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूशी लढण्यास सक्षम बनाल. हा काढा अवघ्या पाच मिनिटांत तयार करू शकता.
काढा बनवण्यासाठी लागणारे सामान
5 ते 6 तुळशीची पाने; काळी मिरीची पावडर; आले; मनुके; अर्धा चमचा इलायची पावडर
कसा बनवायचा काढा
प्रथम आपण एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी टाका. आता त्यात तुळशीची पाने, इलायची पावडर, काळी मिरी, आले आणि मनुके टाका. हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून एकजीव करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्या व नंतर हा काढा प्या.
काढा किती प्रभावी?
या काढ्यातील काळी मिरीमुळे कफ बाहेर पडतो. तुळशी, आले आणि इलायची पावडरमध्ये अँटी-इन्फ्लेमटरी प्रॉपर्टीज असतात. याचा आपल्याला श्वाससंबंधी कुठला त्रास असेल तर तो त्रास कमी करण्यास खूप मदत होते. तुळशी आणि काळी मिरीमुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते.
काय होतात फायदे?
पचन क्षमता सुधारून शरीरातील खराब पदार्थ बाहेर फेकले जातात. काळी मिरीमुळे कफ बाहेर पडतो. तुळसी, आले आणि दालचिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यांचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.
तुळशीतील अँटी-मायक्रोबियल गुणांमुळे श्वसनासंबंधी त्रास दूर होतो. हा काढा दिवसातून दोनवेळा घेतल्यास तुमची इम्युनिटी हमखास वाढली म्हणून समजा. अनेक घातक आजारांपासून आपली सुटका करून घेण्यात हा काढा प्रभावी आहे. सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाल्यास हा काढा जरून घ्या. त्यामुळे तुमच्या गळ्याला आराम मिळू शकतो.