Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पौगंडावस्थेतील मुलांमध्ये होतात शारीरिक, मानसिक, लैंगिक बदल; पालकांनो, वेळीच समजून घ्या !

by प्रभात वृत्तसेवा
August 18, 2021
in आरोग्य वार्ता
A A
पौगंडावस्थेतील मुलांमध्ये होतात शारीरिक, मानसिक, लैंगिक बदल; पालकांनो, वेळीच समजून घ्या !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पौगंडावस्था हा एक टप्पा आहे ज्यामध्ये मुलांना सांभाळताना पालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. पौगंडावस्थेत, मुलांमध्ये असे बदल होतात जे कधीकधी त्यांना स्वतःला समजत नाहीत. 

या परिवर्तनातून जात असताना, ते विविध प्रकारच्या मानसिक संघर्षातून जातात. शरीरात होत असलेल्या बदलांमुळे, बऱ्याच वेळा ते समन्वय साधण्यास असमर्थ असतात आणि विविध समस्यांना तोंड देऊ लागतात. 

अशा परिस्थितीत पालकांची जबाबदारी आणखी वाढते. एका संशोधनानुसार, पौगंडावस्थेतील (12-19 वर्षे) मुलांना शारीरिक बदलांशी संबंधित शिक्षण देणे फार महत्वाचे आहे.

शारीरिक बदल

पौगंडावस्था दरम्यान,मुलांमध्ये अनेक प्रकारचे शारीरिक बदल घडतात. मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होते तर मुलांमध्ये आवाज बदलणे, मिशा आणि चेहऱ्यावर दाढी येणे, असे बदल घडतात. या बदलांमुळे मुले अस्वस्थ होतात. त्यांच्यात अचानक हे बदल का होत आहेत हे त्यांना समजत नाही. ते त्यांच्या पालकांशी त्याबाबत उघडपणे बोलू शकत नाहीत. अशा वेळी पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

मानसिक बदल

किशोरवयीन मुले देखील मानसिक बदलांमधून जातात. हा मानसिक बदल हार्मोनल आणि न्यूरोडेवलपमेंटल बदलांमुळे होतो. मुले स्वतःचे निर्णय घेऊ लागतात. ज्यामुळे अनेक वेळा ते पालकांचे अजिबात ऐकत नाहीत आणि त्यांच्यामध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणे आवश्यक आहे.

करिअरबद्दल ताण

या टप्प्यावर, मुलांमध्ये केवळ शारीरिक-मानसिक बदल होत नाहीत, तर ते त्यांच्या करिअरबद्दल चिंता करू लागतात. त्यांना भविष्यात काय करावे लागेल याची चिंता सतावते. ते हा ताण घेऊ शकत नाहीत ज्यामुळे तणाव वाढून परिणामी मुले रागीट व चिडचिडी होतात. पालकांनी मुलांमध्ये हा बदल समजून घेतला पाहिजे.

लैंगिकतेचा विकास

पौगंडावस्था दरम्यान, मुलांमध्ये लैंगिकतेची भावना निर्माण होऊ लागते. त्यांना हा बदल समजत नाही. म्हणूनच हे आवश्यक आहे की पालकांनी मुलांना वाढत्या वयानुसार लैंगिक जीवनाशी संबंधित शैक्षणिक गोष्टी सांगणे आवश्यक आहे.

वाईट संगत 

जसजशी मुले मोठी होत जातात तसतसे ते मित्रांसोबत हँग आउट करतात. या काळात ते चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही लोकांना भेटतात.अशा काळात जर त्यांची चुकीच्या सवयी असणाऱ्या मुलांशी मैत्री झाली तर मुल धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या वाईट सवयींना बळी पडू शकते. या काळात पालकांनी मुलांच्या संगतीकडे लक्ष देणे तसेच संयमाने त्यांची स्थिती समजून घेणे महत्वाचे आहे.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar