Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पेट्रोलवरील दुचाकीला बनवा इलेक्ट्रिक, केवळ ‘इतके’ रुपये येईल खर्च – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
January 14, 2022
in लाईफस्टाईल
A A
पेट्रोलवरील दुचाकीला बनवा इलेक्ट्रिक, केवळ ‘इतके’ रुपये येईल खर्च – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram
chitale-mob

Petrol To Electric Bike – तुम्हीही पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण असाल, तर तुमच्या पेट्रोल दुचाकी किंवा स्कूटरमध्ये इलेक्ट्रिक किट रिट्रोफिट करून घेऊ शकता. यामुळे तुमचा मासिक पेट्रोलचा खर्च जवळपास निम्म्याने कमी होईल. तसेच टू-व्हीलरमध्ये इलेक्ट्रिक किट बसवण्याचा खर्चही काही जास्त नाही…

जर तुमच्याकडे हिरो स्प्लेंडर किंवा होंडा अॅक्टिव्हा यांसारखी दुचाकी असेल तर तुम्ही यांना इलेक्ट्रिक वाहनात रूपांतरित करू शकता. सध्या देशाच्या विविध भागात अनेक स्टार्टअप्स आहेत जे टू-व्हीलरमध्ये इलेक्ट्रिक किट रिट्रोफिटिंग करण्याचे काम करतात. Zuink, GoGoA1 आणि Bounce या कंपन्या पेट्रोल दुचाकील इलेक्टिक दुचाकीत रुपांतरीत करतात. ते तुमच्या मोटारसायकलचे इंजिन आणि गिअरबॉक्स बदलतात आणि तुमच्या वाहनात इलेक्ट्रिक मोटर बसवतात. यामुळे पेट्रोलच्या खर्चात मोठी बचत होऊ शकते.

गूगल सर्च केले तर तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे इलेक्ट्रिक मोटर किट सापडतील. परंतु या किटला सरकारची मान्यता नाही, त्यामुळे जेव्हा तुमची बाईक तपासली जाईल तेव्हा तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता, कारण मोटार वाहन कायद्याच्या कलम-52 नुसार कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला फक्त आरटीओ मान्यताप्राप्त इलेक्ट्रिक किट बसवावे लागेल.

इलेक्ट्रिक किट बसवण्यासाठी येतो इतका खर्च –

पेट्रोल स्कूटर इलेक्ट्रिक बनवण्यासाठी आरटीओने मंजूर केलेल्या रेट्रोफिट इलेक्ट्रिक मोटर किटची किंमत 15,000 ते 20,000 रुपये आहे. परंतु तुम्हाला बॅटरीची किंमत स्वतंत्रपणे द्यावी लागेल. तसे पाहिले तर ही केवळ एक-वेळची किंमत आहे. एकदा खर्च केला तर दररोजच्या पेट्रोलच्या किंमतीपेक्षा कितीतरी फायदेशीर आहे. बॅटरीही 3 वर्षांच्या वॉरंटीसह येते.

तसेच काही कंपन्या बॅटरी भाड्यानेही देतात. Zuink कंपनी ही सुविधा देते. मात्र ही कंपनी सध्या फक्त बंगळुरूमध्ये आपली सेवा पुरवते. त्यांच्याकीटची किंमत 27,000 रुपये असून महिन्याच्या ईएमआय ची देखील सुविधा आहे. 899 रुपये प्रति महिना हप्त्यावर देखील घेऊ तुम्ही हे किट घेऊ शकता. GoGoA1 कंपनीच्या इलेक्ट्रिक किटची किंमत 35,000 रुपये आहे. ते तुमची स्प्लेंडर बाइक इलेक्ट्रिकमध्ये बदलू शकते. मात्र, यामध्ये बॅटरीची किंमत आणि जीएसटी वेगळा भरावा लागणार लागतो. पण कंपनीचा दावा आहे की, त्यांचे किट एका चार्जमध्ये 151 किमी पर्यंत धावू शकते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar