बेंगलुरु – घरापासून दूर शिक्षणाच्या निमित्ताने किंवा इतर कोणत्याही कारणाने पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आजार होण्याची शक्यता जास्त असते या विद्यार्थ्यांना डिप्रेशन किंवा चिंताग्रस्तपणा हे मानसिक आजार सतावण्याची शक्यता अधिक असते. बेंगलोरु येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स या संस्थेने केलेल्या संशोधनानंतर हा निष्कर्ष समोर आला आहे.
संशोधनामध्ये 18 ते 29 या वयोगटातील 315 विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यात आला त्यापैकी दहा टक्के विद्यार्थ्यांना डिप्रेशनचा त्रास होता. तर 14% विद्यार्थ्यांना चिंताग्रस्त पणा म्हणजेच अंक्साईटी या मानसिक विकाराचा त्रास होता कोणत्याही व्यक्तीला दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ डिप्रेशनची लक्षणे दिसत असतील तर त्यांनी लगेच मानसिक उपचार करून घेणे गरजेचे असल्याचेही संशोधकांनी या अहवालात म्हटले आहे. म्हणजेच कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे जेवण खाण न जाणे सतत नाही नैराश्याची भावना येणे असे संकेत जर मिळत असतील तर अशा व्यक्तीने दोन आठवड्यानंतर मानसिक उपचार तातडीने करून घ्यावेत असे संशोधकांनी म्हटले आहे.
संशोधनात सामील झालेले बहात्तर टक्के विद्यार्थी डिप्रेशनने ग्रस्त असूनही कोणत्याही डॉक्टरचा सल्ला घेत नव्हते तर 60% विद्यार्थी चिंताग्रस्तपणा या मानसिक विकार आणि त्रस्त होते. पण त्यांनीही कोणत्या डॉक्टरचा सल्ला घेतला नव्हता या सर्व विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण त्यांना चांगल्या नोकरीची हमी असतानाही डिप्रेशन आणि चिंताग्रस्तापणा या मानसिक विकारांचा सामना करावा लागत आहे. पुढच्या कारकिर्दीमध्ये याचा त्रास होऊ नये म्हणून अशा लोकांनी त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे अहवालात सुचवण्यात आले आहे.
The post पेइंग गेस्ट विद्यार्थ्यांना मानसिक आजाराचा जास्त धोका ! डिप्रेशन किंवा चिंताग्रस्तपणाची समस्या सतावण्याची शक्यता appeared first on Dainik Prabhat.
