पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल
मेंथा स्पीशीज कुल : लेबिएटीई
May 18th, 8:15amMay 17th, 2:49pm
प्रभात वृत्तसेवाआरोग्य जागर
ही औषधी वनस्पती 1500 ते 3000 मीटर उंचीवर काश्मीरमध्ये सापडते. ती मुद्दाम लावलीसुद्धा जाते.
भूमध्य समुद्राचा प्रदेश हे पुदिन्याचे मूळ उत्पत्तीस्थान समजले जाते. परंतु हल्ली सर्व देशांमध्ये पुदिन्याची पैदास होते. चीनमध्ये पुदिन्याचे उत्पन्न खूप होते. भारतामध्येही बागेमध्ये व शेतांमध्ये पुदिन्याची लागवड केली जाते. नरम आणि चांगली निचरा होणारी जमीन पुदिन्याला अनुकूल असते. त्याची लहान – लहान रोपे जमिनीवर पसरतात व ठिकठिकाणी त्यालामुळे फुटतात.
पुदिन्याच्या देठांचा रंग लाल असतो. त्याची पाने तुळशीसारखी असतात; परंतु काही पाने लहान व गोलही असतात. पुदिन्याची मूळ असणारी देठे जमिनीत लावली जातात. पुदिना कुठेही लावता येतो; परंतु पाऊस झाल्यावर त्याची लागवड करणे चांगले. पुदिना उन्हाळ्यात चांगला पसरतो. पुदिन्याच्या रोपांना एक सुंदर वास असतो. आपल्या परसात ज्या ठिकाणी आंघोळीचे पाणी जाते तेथे किंवा कुंडीमध्येही सहजतेने पुदिना लावता येतो. ज्या घरात सतत पुदिन्याचा वास आहे. त्या घरात सर्दी वाऱ्यालाही उभी राहात नाही. अपचनावर पुदिना उत्तम औषध आहे. पुदिन्याच्या रसाच्या सेवनाने छातीत भरलेला कफ मोकळा होऊन दम्यामध्ये व तीव्र श्वासामध्ये आराम मिळतो. गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यात पुदिन्याचे चांगले उत्पन्न होते.
बहुधा मेन्था या जातीची स्थानिक भारतीय नावे पुदिना या शब्दावरुन घेण्यात आलेली आहेत किंवा पिुदना नावाने ओळखली जातात. मेन्था या प्रजातीतील झाडे सुवासिक औषधी अहेत, अनेक जाती नैसर्गिकरित्या उगवतात; काही लावली जातात. या झाडातील महत्त्वाचे घटक मेन्थाल व पेपरमिंट ऑइल आहेत आणि त्यासाठीच ही झाडे महत्त्वपूर्ण मानली जातात.
मेन्था आरव्हेनसिस इंग्रजी – फिल्ड मिंट, कार्न मिंट; भारतातील नाव पुदिना. ही ताठ, सरळ 60 से.मी. पर्यंत वाढणारी, बहुशाखीय औषधी आहे; पाने 5 से.मी. पर्यंत लांब; पर्णवृंत लहान किंवा जवळ जवळ नसलेले, कडा दातेरी; फुले लहान गुलाबी पानांच्या अक्षकोनातील लहान गुच्छांमध्ये. या झाडाच्या पानांचा काढा संधिवाताच्या दुखण्यावर आणि अपचनावर वापरण्यात येतो.
या झाडाचा जपानी प्रकार – मेन्था आरव्हेनसिस उपजाती हॅपलोकॅलीक्स पायपरआस्सेनस जम्मू आणि काश्मीरमध्ये लावण्यात आला आहे. झाडापासून जे तेल काढतात त्यास जॅपनीज पेपरमिंट ऑइल या व्यापारिक नावाने संबोधण्यात येते. हे खऱ्या पेपरमिंट तेलाऐवजी वापरण्यात येते. ते मेन्था पाइपेरिटा या झाडापासून मिळते.
पुदिना वातहारक औषध म्हणून खूपच प्रसिद्ध आहे. आमटी-भाजीतही पुदिना घातला जातो. पुदिन्याची एक रानटी जात आहे. उत्तर भारतात या पुदिन्याचा मुख्यत्वाने उपयोग केला जातो. या पुदिन्याचा वास आपल्या देशी पुदिन्यासारखाच, पण खूप तीव्र असतो. पुदिना अपचनावर उपयुक्त, पाचक व तोंडात रूची निर्माण करणारा आहे. पुदिन्याचा उपयोग मुख्यत: चटणीमध्ये केला जातो. पुदिन्याची चटणी रूचकर लागते. या चटणीमुळे अपचन व तोंडाची अरूची दूर होते. कढीमध्ये व काढ्यामध्येही पुदिन्याचा उपयोग केला जातो. आमटी-भाजीतही पुदिना घातला जातो. रोज ताजा पुदिना मिळविण्यासाठी तुळशीप्रमाणे घराघरातून पुदिना लावला पाहिजे. जर ताजा पुदिना मिळवणे अशक्य असेल, तर पुदिन्याची पाने सुकवून त्याचा उपयोग करता येतो. पुदिन्यापासून अर्क काढण्यात येतो. हा अर्क विशेषत: अपचनावर व वायूवर गुणकारी असतो.
पुदिना स्वादू, रूचकर, ह्दय, उष्ण, दीपक, वायू व कफहारक व मलमूत्र रोखणारा असतो. पुदिना खोकला, अग्निमांदय, संग्रहणी, अतिसार, कॉलरा, जीर्णज्वर व कृमीनाशक आहे. पुदिना उलट्या बंद करण्यासाठी उपयुक्त औषध आहे. ती चित्त प्रसन्न ठेवणारी व पचनशक्ती वाढवणारी वनस्पती आहे. पुदिना पित्तकारक, गुर व मातेचे दूध बिघडले असल्यास ते सुधारणारा पुदिना अतिरिक्त दुधाचे शोषण करून दुधाचा जोर कमी करतो.
ताजा पुदिना, खारीक, मिरे, सैंधव, हिंग व जिरे हे सर्व जिन्नस वाटून त्यांची चटणी करावी. या चटणीत लिंबाचा रस पिळून तो खाल्ल्याने तोंडाला रूची येते. वायू दूर होऊन पचनशक्ती चांगली होते व शरीराचा फिकटपणा दूर होतो.
==================