Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पुणेकर महायुतीच्या प्रेमात! आठपैकी सात जागांवर विजय

by
November 24, 2024
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

पुणे –  लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेलाही पुणेकरांंनी महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. लोकसभेला राज्यभरात महायुतीची पिछेहाट झाल्याने शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात पुणेकर कोणाला कौल देणार, याची उत्सुकता होती. अखेर पुणेकरांनी महायुतीच्या आणि विशेषत: भाजपच्या सर्वच उमेदवारांना भरभरून मतांची बेगमी दिली असून आठ मधील सहा जागा भाजपला मिळाल्या आहेत, तर प्रत्येकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाला संधी मिळाली आहे.

एकेकाळी पुणे शहर आणि जिल्ह्यात दबदबा असलेल्या काॅंग्रेसला शहरासह, जिल्ह्यात एकही जागा मिळालेली नाही. कोथरूड-चंद्रकांत पाटील, पर्वती-माधुरी मिसाळ, खडकवासल-भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्में-सुनील कांबळे, शिवाजीनग-सिद्धार्थ शिरोळे, हडपसरमधून चेतन तुपे विजयी झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत शहराचे नेतृत्व करणाऱ्या या सहा जणांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. तर, कसब्यातून हेमंत रासने विजयी झाले. वडगाव शेरीतून बापूसाहेब पठारे १० वर्षांनंतर पुन्हा आमदार झाले आहेत.

कसबा पुन्हा भाजपच्या ताब्यात
पुण्यात २०१४ मध्ये आठही मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या भाजपचे २०१९च्या निवडणुकीत सर्वच मतदारसंघांत मताधिक्य घटले होते. तर, २०२२ मध्ये झालेल्या कसबा विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भाजपने या पराभवाचा वचपा सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काढला. आता विधानसभा निवडणुकीतही भाजपने हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेतला असून, भाजपचे रासने यांंनी आमदार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे.

विक्रमी मताधिक्य
भाजपच्या सहापैकी पाच उमेदवारांना या निवडणूकीत विक्रमी मताधिक्य मिळाले आहे. त्यात चंद्रकांत पाटील यांना तब्बल १ लाख १२ हजार, माधुरी मिसाळ-५४ हजार, भीमराव तापकीर-५२ हजार, सिद्धार्थ शिरोळे- ३६ हजार, हेमंत रासने-१९ हजार आणि सुनील कांबळे यांना १० हजारांचे मताधिक्य आहे.

महाविकास आघाडीला मनसेचा फटका
मनसेने विधानसभेला पुण्यात चार उमेदवार दिले होते. त्यात दोन मतदारसंघांत महाविकास आघाडीला मनसेच्या मतांचा जबर फटका बसला आहे. खडकवासला मतदारसंघात मयूरेश वांजळे यांना तब्बल ४२ हजार ८९४ मते मिळाली. हडपसरमध्ये साईनाथ बाबर यांनी ३२ हजार ८२१ मते मिळाली. या दोन्ही ठिकाणी मिळालेली मते निवडणुकीचा निकाल बदलण्यामध्ये निर्णायक ठरली आहेत. हडपसरमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांचा सात हजार मतांनी पराभव झाला आहे.

असे आहे पुण्याचे चित्र
भाजप – ६
राष्ट्रवादी काँग्रेस – १
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – १

Join our WhatsApp Channel

The post पुणेकर महायुतीच्या प्रेमात! आठपैकी सात जागांवर विजय appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar