Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पीसीओडी – स्त्रियांची अतिशय महत्त्वाची तक्रार – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
December 28, 2021
in आरोग्य वार्ता
A A
पीसीओडी – स्त्रियांची अतिशय महत्त्वाची तक्रार – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

चार-पाच वर्षांपूर्वी चेहऱ्यावरील मुरमांसाठी होमिओपॅथिक उपचार करून घेण्यासाठी एक मुलगी आली होती. त्या किशोरवयीन बालिकेचा बांधा अगदी किरकोळ वाटत होता. तिने सांगितलेल्या तक्रारी समजून घेऊन तिला होमिओपॅथिक औषधे दिली. यानंतर मात्र पुढील काही महिने या ना त्या कारणासाठी तिची आईच क्‍लिनिकमधून तिच्यासाठी औषधे घेऊन जात होती. औषधे लागू पडत असल्याचे तिची आई सांगत होती.

आता बऱ्याच वर्षांनी ती स्वत: औषधोपचार करून घेण्यासाठी आली होती. यावेळी तिचा किरकोळ बांधा जाऊन शरीरयष्टी थोडी वजन वाढीकडे झुकल्याचे जाणवत होते. यावेळी तिची तक्रार अनियमित मासिक पाळीच्यासंदर्भात होती. तिने बरोबर आणलेले सोनोग्राफीचे रिपोर्टस पाहता तिला हा त्रास सुरू होऊन किमान दोन वर्षे झाली असावीत असे वाटत होते. तिच्या तक्रारीच्या निवारणाकरीता तिचा पूर्वइतिहास पुन्हा नव्याने समजून घेणे आवश्‍यक होते.

पूर्वी जेव्हा ही मुलगी औषधाकरिता येत होती तेव्हापासूनच तिला अनियमित पाळीचा त्रास होत होता. मात्र, सुरुवातीचे काही महिने असा त्रास होऊ शकतो असे वाटून त्यासाठी तिने कोणतेही उपचार घेतले नव्हते. नंतरचे काही महिने थोडे सुरळीत गेले. पुढे अभ्यास, क्‍लास या चक्रात या गोष्टीकडे तिचे थोडेफार दुर्लक्षच झाले.

थोडक्‍यात, तिच्याकडून या तक्रारीकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही. सद्यपरिस्थितीत तिला उच्चपदस्थ नोकरी मिळाली होती. दिवसातील बरेच तास तिला बसूनच काम करावे लागत होते. कामाच्या व्यापात तब्येतीची काळजी म्हणून जमेल तसे चालायला जाण्याचा सोपा व्यायाम सुरू होता; परंतु काटेकोरपणे जेवणाच्या वेळा पाळता येत नव्हत्या. त्यामुळे वजन वाढत होते.

दरम्यान, पाळीच्या तक्रारीसंदर्भात तपासणी केल्यावर पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅरीयन डिसीज असल्याचे समजले. म्हणून काही महिने तिने इतर औषधोपचार करून घेतले होते. तरीही तिला अनियमित पाळीचा त्रास सुरूच होता.

याच कारणासाठी पुन्हा उपचार घेण्यासाठी ती क्‍लिनिकला आली होती. तिच्या एकूण तक्रारी नव्याने समजावून घेतल्यावर तिला योग्य ते होमिओपॅथिक औषधे दिले. त्याच बरोबरीने तिच्या शरीरामध्ये आलेला असमतोल संतुलित करण्यासाठी पोश्‍चर थेरपीदेखील सुरू केली.

तिची ही तक्रार बरेच वर्षांपासून असल्याने किमान पुढील सहा महिने तरी सातत्याने उपचार घेणे तिच्यासाठी आवश्‍यक होते. तिने उपचार करूनही घेतले. सहा महिन्यांनंतर पुन्हा सोनोग्राफीचा रिपोर्ट केला असता रिपोर्टमध्ये सिस्ट नसल्याचे आढळून आले. थोडक्‍यात, योग्य असा बदल आढळून आला होता. उपचार सुरू केल्यानंतर केवळ दुसऱ्या महिन्यातच तिची मासिक पाळी सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती.

या पीसीओडी नावाच्या स्त्रियांच्या तक्रारींचे प्रमाण सध्याच्या दिवसात अधिक प्रमाणात आढळून येत आहे. नैसर्गिकरीत्या सुरळीत आणि नियमित होणाऱ्या मासिक पाळीच्या काळात शरीरातील हार्मोन्सच्या प्रमाणामध्ये कमालीचा बदल होत असतो. प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवसांमध्ये घडणाऱ्या या बदलांत हार्मोन्स कमी होणे आणि काही वाढणे हे निसर्गत: शक्‍य आहे.

काही मुलींमध्ये मात्र स्त्री संप्रेरकाची पातळी कमी होऊन पुरुषांमध्ये आढळणारी संप्रेरकाची पातळी वाढू लागते. परिणामी ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होतात आणि मासिक पाळी अनियमित होते. यालाच पॉलिसिस्टिक ओव्हॅरीयन डिसीज म्हणतात.

अशा मुलींच्या चेहऱ्यावर लव दिसू लागते. बैठे काम, व्यायामाचा अभाव, आहार विहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे वरील तक्रार उद्‌भवण्याची दाट शक्‍यता असते. पोश्‍चर थेरपीनुसार, असा त्रास असणाऱ्या मुलीच्या शरीराचा समतोल बिघडायला सुरुवात झालेली असते.

साधारणपणे अशा तक्रारी उद्‌भवतात अशा बहुतांश मुलींच्या तळपायाची आर्च कमी असते. त्यांच्या पोटाचा आणि नितंबाचा घेर शरीराच्या मानाने अधिक असतो. तो संतुलित होण्याकरिता योग्य प्रकारे योग्य प्रमाणात दिली जाणारी होमिओपॅथिक औषधे आणि बरोबरीने पोश्‍चर थेरपीद्वारे केलेले उपाय योग्य प्रकारे लागू पडतात. आणि मासिक पाळी सुरळीत होण्यास आवश्‍यक ती मदत निश्‍चितपणे होऊ शकते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar