पुणे – ‘नाक, कान टोचण्याची सध्या तरुण-तरुणींमध्ये क्रेझ आहे. मुलींबरोबरच मुलांमध्येही कान, नाक, भुवई टोचण्याचा प्रकार सर्रास नजरेस पडतो. पिअर्सिंग म्हणजे नाक किंवा शरीराच्या कोणत्याही अंगाला टोचून घेऊन आवडते दागिने जसे सर्जिकल स्टेलनेस स्टिल, सोने, प्लॅटिनम घालून तुम्ही मिरवू शकतात. फॅशनसाठी आता नाक आणि कानाशिवाय ओठ, जीभ, भुवई आणि नाभीमध्येही पिअर्सिंग केले जाते.
मात्र पिअर्सिंग करण्याअगोदर काही गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे की, तुम्हाला एखाद्या धातूची ऍलर्जी आहे किंवा नाही. विशेषतः सर्जिकल स्टेलनेस स्टिल, प्लॅटिनम या धातूमुळे काहींना पिअर्सिंगनंतर त्रास जाणवतो.पिअर्सिंग केल्यानंतर थोडे रक्त निघणे, सूज येणे असे प्रकार सहज घडू शकतात. बऱ्याच वेळा पिअर्सिंग केल्यानंतर त्या जागी फोड येतो. तो फोडू नये. काही वेळा पियर्सिंग करण्यापूर्वी याबाबत माहिती नसल्यास बॉडी पियर्सिंग नुकसानकारकही ठरू शकते.
असं काहीसे ब्राझिलमध्ये एका तरुणाच्या बॉडी पिअरर्सिंगची फॅशन अंगलट आली आहे. या तरुणीला बॉडी पिअरर्सिंगचे तोटे माहिती नसल्याने या तरूणीचा मृत्यू झालाय. पिअरर्सिंगनंतर झालेल्या इन्फेक्शनमुळे तिचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. डोळ्याच्या वरच्या त्वचेवर या मुलीनं पिअरर्सिंग करण्याचा प्रयत्न केला होता. या १५ वर्षीय मुलीचे नाव इजाबेला होते. इन्फेक्शन वाढत गेल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिला जवळपास ४ वेळा हार्ट अटॅक आले. यादरम्यान तिच्या मृत्यू झाला आहे.
दरम्यान,बॉडी पिअरर्सिंगचे तोटे माहिती असणे आवश्यक आहे. बॉडी पिअरर्सिंग करतांना नेहमी नवी सुई वापरायला हवी. जिथे टोचायचे आहे ती जागा अगोदर साबणाने स्वच्छ धुऊन कपड्याने साफ करून थोडा वेळ थांबावे. नियमित खाऱ्या पाण्याने पिअर्सिंगची जागा स्वच्छ करायला हवी. तुम्हाला पोहण्याचा छंद असेल तर, पिअर्सिंगनंतर कमीत कमी एका आठवड्यापर्यंत स्वीमिंग करू नये. दागिना जर पिअर्सिंगच्या जागी चिकटला असेल आणि सहज गोलाकार फिरवता येत नसेल तर दागिना काढून टाकावा. काही दिवसांनी पुन्हा दागिना घालू शकता.