Saturday, December 6, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पिंटरेस्ट (Pinterest) म्हणजे काय? ‘या’ कारणांमुळे ठरते इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळे

by प्रभात वृत्तसेवा
May 13, 2022
in लाईफस्टाईल
A A
पिंटरेस्ट (Pinterest) म्हणजे काय? ‘या’ कारणांमुळे ठरते इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सध्याचा काळ हे सोशल मीडियाचे युग म्हटले जाते. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक सक्रिय असतात. फेसबुक, टेलिग्राम, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम या सोशल मीडिया टूल्सप्रमाणेच ‘पिंटरेस्ट’ (Pinterest) हे देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावर अकाउंट तयार करून फोटो, व्हिडिओ आणि कंटेंट शेअर करता येतो. मात्र पिंटरेस्ट इतर सोशल मीडिया ऍप्सपेक्षा थोडा वेगळा आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीची सर्व माहिती छायाचित्रे किंवा GIF द्वारे एकाच ठिकाणी मिळते. ते गुगल प्ले स्टोर आणि ऍपल प्ले स्टोरवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

अमेरिकेत मुख्य कार्यालय

पिंटरेस्ट ही अमेरिकन कंपनी आहे. त्याची स्थापना २०१० मध्ये झाली. याचे मुख्य कार्यालय अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात आहे. पिंटरेस्ट ऍप अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीसाठी उपलब्ध आहे. अँड्रॉईड मोबाईल फोन वापरकर्ते ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात, तर आयफोन वापरकर्त्यांसाठी हे ऍप ऍपल ऍप स्टोअरवर उपलब्ध आहे. या अकाऊंटवर जीमेल अकाऊंटच्या मदतीने अगदी सहजपणे तयार करता येते. एवढेच नाही तर बिझनेस अकाउंट तयार करून तुम्ही तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात सहज करू शकता.

पिंटरेस्टला म्हणतात ‘इमेज शेअरिंग सोशल मीडिया’ 

हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खास फोटोंसाठी वापरला जातो. या ऍपमध्ये युजरला विविध प्रकारचे फोटो सहज मिळतील. इतकंच नाही तर फोटोंसाठीही वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. पिंटरेस्टला इमेज शेअरिंग सोशल मीडिया देखील म्हणतात. यामध्ये फोटो आणि जीआयएफच्या माध्यमातून कोणत्याही विषयावर माहिती मिळू शकते. पिंटरेस्टवर वेबसाइट किंवा ऍपद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो. ऍपवर त्याचे २५० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत.

इतर मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळे

पिंटरेस्ट इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळे आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे, वापरकर्ता त्याच्या व्यवसायाशी संबंधित छायाचित्रे शेअर करून त्याचा व्यवसाय आणखी वाढवू शकतो. याशिवाय यूट्यूब व्हिडीओजची व्ह्यूअरशिपही याद्वारे घेता येणार आहे. यासह, या ऍपद्वारे, वापरकर्ता त्याच्या ब्लॉग किंवा वेबसाइटचा फोटो लिंकसह शेअर करून त्याच्या वेबसाइटचा ट्रॅफिक वाढवू शकतो.

अनेक प्रकारचे फीचर्स 

जर आपण पिंटरेस्टच्या फीचर्सबद्दल बोललो तर त्यात अनेक प्रकारचे फीचर्स अंतर्भूत आहेत. जे त्याला इतर मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळे बनवतात. यामध्ये वेगवेगळ्या श्रेणींमध्ये छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. वापरकर्ते त्यांना पाहू इच्छित असलेल्या श्रेणीवर क्लिक करून त्यांच्या आवडीची छायाचित्रे सहजपणे पाहू आणि शेअर करू शकतात. यात पिनिंग फीचर देखील आहे.

यासोबतच फोटोंचा बोर्ड किंवा ग्रुप बनवता येतो. यासोबतच गुगल ऍनालिटिक्सप्रमाणे पिंटरेस्टमध्ये  ऍनालिटिक्सची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये किती लोकांनी पोस्ट शेअर केली किंवा त्यावर क्लिक केले हे देखील पाहता येईल. तथापि, पिंटरेस्टवरील ऍनालिटिक्स केवळ व्यवसाय खाते असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. यासोबतच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे यातही मेसेज पाठवण्याची सुविधा आहे.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar