पावसाळ्यात सर्वात मोठी अडचण काय असते तर ती म्हणजे कपडे वाळवण्याची.. पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे कपडे लवकर वाळत नाहीत. विशेष म्हणजे शहरात छोट्या जागेमुळे कपडे वाळवण्यासाठी अडचण येते. जास्त दिवस कपडे ओले राहिल्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येणे, बुरशी लागणे, अश्या समस्या निर्माण होतात. ओले कपडे वापरल्यास त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात.
पावसाळ्यात ओले कपडे सुकवणे कठीण काम असले तरी या सगळ्या गोष्टींवर उपाय आहेत. येथे नमूद केलेल्या काही टीप्सचा तुम्ही वापर करू शकता.
१. इस्त्रीचा वापर करू शकता –
कपडे सुकवण्यासाठी इस्त्री वापरने हा एक सोपा उपाय आहे. इस्त्रीचा वापर केल्याने कपड्यातील असलेला ओलावा कमी होतो. जीन्स किंवा टीज असे काही जाड कपडे आपण सतत वापरत असतो जे दैनंदिन वापरात येतात. या कपड्यांच्या जाड भागात जर तुम्हाला ओलावा जाणवत असेल तर तुम्ही इस्त्रीचा सहज वापर करून ते ओलावा दूर करू शकता.
२. हैंगर चा वापर करा –
हैंगरला कपडे लावल्याने कपडे लवकर सुकण्यास मदत होते. जरी आपण वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतले तरी कपड्यांमध्ये थोडे पाणी शिल्लक राहते. त्यामुळे कपड्यातील अतिरिक्त्त पाणी काढून टाकण्यासाठी कपडे धुतल्यानंतर ते ओले कपडे हॅन्गरवर लटकवावे कारण कपड्यात असलेले शिल्लक पाणी नितरण्यास मदत होते आणि कपडे लवकर सुकायला सुद्धा मदत होते.
३. कपडे वाळत घालण्यासाठी स्टॅन्डचा वापर करा –
कपडे सुकवण्यासाठी बऱ्याचदा आपण घरगुती गोष्टींचा वापर करत असतो. तसेच प्रत्येकाच्या घरात अथवा बाल्कनीत, व्हरांड्यात कपडे सुकवण्यासाठी रॅक, स्टॅन्डचा वापर तुम्ही करु शकता आणि घरात फॅनखाली वाळत देखील घालू शकता. जेणेकरून तुमचे कपडे लवकर वाळण्यास मदत होते.
४. हेअर ड्रायरचा वापर करा –
हेअर ड्रायर आपण आपले केस सुकवण्यासाठी, सेट करण्यासाठी वापरत असतो. तसेच तुम्ही त्या हेअर ड्रायरचा वापर कपडे सुकवण्यासाठी देखील सहज करू शकता. कारण ते हाताळायला देखील सोपे आहे.
५. वॉशिंग मशीन ड्रायरचा वापर करा –
पावसाळ्यात कपडे लवकर धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करता तसेच तुम्ही मशिनमध्येच कपडे नीट वाळवण्यासाठी मशिनचा सुकण्याचा वेळ थोडा वाढवू देखील शकता. जर तुम्ही १ मिनिटासाठी ड्रायर वापरत असाल तर त्याचा वेळ तुम्ही २ किंवा ३ मिनिटांवर सेट करू शकता. त्यानंतर तुम्ही कपडे मोकळ्या वातावरणात टाकू शकता.
वरील सर्व टिप्स ह्या घरगुती आणि सोप्या आहेत जेणेकरून तुम्ही त्याचा सहज उपयोग करू शकता….
The post पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत..? या टिप्स फॉलो करा appeared first on Dainik Prabhat.