पावसाळ्यात बाईकवरून रोड ट्रिपची मजा काही औरच असते. बहुतेक बाईक प्रेमी पावसाळा येताच त्यांच्या मित्रांसोबत किंवा जोडीदारासोबत रोड ट्रिपचे नियोजन करण्यास सुरवात करतात. या ऋतूत निसर्गाचे देखावे आणखीनच सुंदर होतात. गार वारा आणि रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ, जणू काही आपलं स्वागत करत असतात.
मात्र पावसाळ्यात रोड ट्रिप मजा करण्यापेक्षाही जास्त जोखमीची असते. पावसाळ्यात भारतातील रस्त्यांवर बाईक चालवणे आव्हानापेक्षा कमी नाही. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने समस्या अधिकच बिकट होते. अशा परिस्थितीत कोणत्याही खड्डे किंवा खराब रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात दुचाकी थांबली तर मोठा त्रास होतो. चला जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या टिप्स, ज्या पावसाळ्यात आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत.
– लगेच बाइक सुरू करू नका
जर तुमची बाईक रस्त्यावर पाण्यात बुडली असेल, तर लगेचच बाईक सुरू करू नका. कारण हे पाणी मोटरसायकलच्या इलेक्ट्रिक सिस्टीम, व्हील बेअरिंग्स, एक्झॉस्ट, इनटेक आणि ब्रेक्ससह इंजिनच्या आतही जाऊ शकते. यादरम्यान तुम्ही बाइक सुरू केल्यास तिची इलेक्ट्रिक सिस्टम खराब होऊ शकते. पावसाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात घाण साचून रस्त्यावर साचले आहे. ही घाण तुमच्या बाईकच्या सिस्टीममध्ये जाऊन वाहनाचे नुकसान करू शकते.
– बॅटरी कॉर्ड काढा
जर तुमची बाईक पावसाच्या पाण्यात बुडली असेल तर तिची बॅटरी ताबडतोब डिस्कनेक्ट करा. यामुळे बाईकची इलेक्ट्रिक सिस्टीम सुरक्षित राहते. बॅटरी डिस्कनेक्ट करणे देखील आवश्यक आहे. कारण सध्या अनेक प्रगत बाइक्स आहेत ज्यांचे इंजिन बंद असते, परंतु बॅटरीद्वारे विजेचा पुरवठा सुरू असतो. इलेक्ट्रिक ग्राउंडिंग टाळण्यासाठी बॅटरी डिस्कनेक्ट करणे फार महत्वाचे आहे.
– स्पार्क प्लग काढा
जर मोटरसायकलच्या आत पाणी गेले असेल तर बॅटरी व्यतिरिक्त स्पार्क प्लग काढून टाकला पाहिजे. पाणी स्पार्क प्लग थ्रेड्सचे नुकसान करू शकते. जर ते जास्त काळ पाण्यात राहिल्यास, पाण्यात असलेली माती त्यांच्यावर जमा होऊ शकते, त्यानंतर त्यांची साफसफाई करणे खूप कठीण होते.
– आत शिरलेले पाणी काढून टाका
जर पावसाचे पाणी तुमच्या बाईकमध्ये शिरले असेल तर ती दोन्ही बाजूंनी खाली टेकवा. जड मोटारसायकली झुकवणे हे खूप कठीण काम आहे. परंतु, वाहन निर्मात्याने प्रदान केलेल्या साधनांचा वापर करून मोटरसायकलचे पॅनेल कव्हर उघडता येते. परंतु हे तेव्हाच केले पाहिजे जेव्हा तुम्हाला याची जाणीव असेल.
– मेकॅनिककडून तपासा
तुम्हाला कितीही ज्ञान असेल आणि तुमच्या स्तरावर काही टिप्स पाळल्या असतील, तरीही बाइक सर्व्हिस सेंटर किंवा मेकॅनिककडे नक्की घेऊन जा. सध्याच्या मोटारसायकलमध्ये फ्युएल-इंजेक्टेड इंजिन आहेत, ज्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नवीन हायटेक बाईकमध्ये पावसाचे पाणी ECU आणि इलेक्ट्रिक पार्ट्सचे लवकर नुकसान करू शकते.
The post पावसात मोटारसायकल सेफ्टी महत्त्वाची ! ‘या’ सोप्या टिप्सने तुमची बाईक ठेवा सुरक्षित appeared first on Dainik Prabhat.