
पालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक
July 6th, 10:22amJuly 6th, 10:26am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
पालेभाज्या खाताना काही कच्चा तर काही शिजवून खाव्यात. विशेषतः ज्यांच्या आतड्यांना व्रण पडले असतील त्यांनी पालेभाज्यांमधील रेषांचा भाग खाणं टाळावं. अशांनी तो भाग काढून पालेभाजीचा रस पिणे आरोग्याला चांगले.
ज्यांना पातळ जुलाब, मुरडा किंवा संग्रहणीचा त्रास होत असेल किंवा ज्यांचे पोट नाजूक आहे, त्यांनी पालेभाज्यांचा समावेश वारंवार करू नये. ज्यांना मूतखड्याचा त्रास असेल त्यांनी पालक खाणे टाळावे कारण त्यात ऑक्झिलेट्चे प्रमाण अधिक असते.
क्लोरोफिल : पालेभाजीत क्लोरोफिल नावाचा प्रभावी जंतुनाशक घटक असतो. हा घटक दातांत अडकलेल्या अन्नकणांचं निर्मूलन करतो आणि दातांत कीड निर्माण होऊ देत नाही. क्लोरोफिल नुसत्या दातातीलच नव्हे तर शरीरातील, आतड्यातील निरुपयोगी जंतूंचाही नाश करतो. क्लोरोफिलमध्ये उच्च प्रतीचे भरपूर प्रोटीन असते.
जे लोक रसाहार घेतात अशांना भरपूर प्रोटीनची आवश्यकता असते. ते प्रोटीन त्यांना पालेभाज्यांच्या रसामधून मिळते.
लोह : ताज्या पालेभाजीमध्ये लोहही भरपूर असते. आपल्या आरोग्याला लोहाची अत्यंत गरज असते ती गरज पालेभाज्यांच्या रसातून भागवली जाते. विशेषतः पांडुरोगामध्ये जो अशक्तपणा येतो त्यावर हे लोह अधिक उपयुक्त ठरते.
क्षार : पालेभाज्यांमध्ये भरपूर क्षार असतात. ते पोटातील आम्लता कमी करतात. आपल्या शरीरातील रक्ताला क्षाराची फार गरज असते. म्हणून पालेभाज्यांचा रस आपल्या आहारातून जाणं फार महत्त्वाचं आहे.
डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा