Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पालकांनो सावधान.! लहान वयातील मुलांसाठी स्मार्टफोन ठरू शकतो खूप धोकादायक; जागतिक सर्वेक्षणानुसार….

by
May 20, 2023
in आरोग्य वार्ता
A A
पालकांनो सावधान.! लहान वयातील मुलांसाठी स्मार्टफोन ठरू शकतो खूप धोकादायक; जागतिक सर्वेक्षणानुसार….
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – कोविडने मुलांची सवयच बिघडवली आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही ! या साथीनंतर मुलांना फोनचे व्यसन लागले आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे मुलांना पुढे जाण्यास मदत होईल असे वाटल्याने पालकही मुलांना फोन चालवायला देतात, मात्र स्मार्टफोनचा अतिवापर मुलांसाठी भविष्यात समस्या निर्माण करू शकतो.

नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणात असे परिणाम समोर आले आहेत, हे जाणून प्रत्येक पालकांनी थोडे सावध राहण्याची गरज आहे. सर्वेक्षणानुसार, मुले जितक्या लवकर स्मार्टफोन वापरतात, तितक्या कमी वयात त्यांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो.

* सर्वेक्षणात काय सिद्ध झाले?
जागतिक स्तरावर जाहीर झालेल्या सर्वेक्षणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या सर्वेक्षणानुसार लहान वयातच मुलांकडून स्मार्टफोन (टॅब्लेट) वापरल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. ज्या मुलांनी लहान वयातच स्मार्टफोनचा वापर केला आहे, त्या सर्वांच्याच तारुण्यात आल्यावर आत्महत्या, इतरांबद्दलचा राग, मनातील संभ्रम अशा समस्या अधिक दिसून आल्या आहेत.

* हे सर्वेक्षण कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
हे सर्वेक्षण 40 हून अधिक देशांमध्ये करण्यात आले आहे. नवीन जागतिक अभ्यासानुसार, 40 पेक्षा जास्त देशांतील 18-24 वयोगटातील 27,969 प्रौढांकडून डेटा गोळा करण्यात आला, ज्यात भारतातील सुमारे 4,000 लहान मुला-मुलींचा समावेश आहे. या आकडेवारीनुसार, असे आढळून आले की अधिक मुलांना स्मार्टफोनचा त्रास होतो.

एज ऑफ फर्स्ट स्मार्टफोन्स आणि मानसिक आरोग्य परिणामांच्या अभ्यासाचा भाग म्हणून, मानसिक क्षमता आणि लक्षणांचे मूल्यांकन करण्यासाठी मानसिक आरोग्य गुणांक वापरला गेला. त्यानंतर डेटाची तुलना त्या वयाशी करण्यात आली ज्यात उत्तरदाते पहिल्यांदा स्मार्टफोन किंवा टॅबलेटची मालकी नोंदवतात.

* या वयात स्मार्टफोन वापरण्याचा धोका
सर्वेक्षणातील किमान 74 टक्के मुली अशा होत्या ज्यांनी वयाच्या 6 व्या वर्षी पहिला स्मार्टफोन वापरला होता, त्या मुलींमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आढळल्या होत्या. तर ज्या मुलींनी पहिला स्मार्टफोन वापरला त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्या 10 वर्षे वयापर्यंतच्या मुलींची 61% पर्यंत समस्या होती.

वयाच्या 15 व्या वर्षी, स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलींच्या मानसिक आरोग्याशी संबंधित प्रकरणे सुमारे 52% होती. अभ्यासात असे दिसून आले आहे की 46% मुली ज्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी त्यांचा पहिला स्मार्टफोन वापरला होता त्या अस्वस्थ होत्या आणि संघर्ष करत होत्या. मुलांमध्येही हा आकडा सारखाच होता पण त्यांच्यात ही समस्या थोडी कमी होती.

* पालकांसाठी सर्वेक्षणातील विशेष संदेश
या सर्वेक्षणानुसार लहान वयात मुलांना स्मार्टफोन देऊ नका, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. त्याच वेळी, न्यूरोसायंटिस्ट म्हणतात की मुलांवर त्यांच्या समवयस्कांकडून जास्त दबाव असतो, अशा परिस्थितीत पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सामाजिक विकास आणि मानसिक बळकटीसाठी मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवणे चांगले राहील.

The post पालकांनो सावधान.! लहान वयातील मुलांसाठी स्मार्टफोन ठरू शकतो खूप धोकादायक; जागतिक सर्वेक्षणानुसार…. appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar