Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पालकांनो, मुलांचे ‘बेस्ट फ्रेंड’ होण्यासाठी ‘या’ पाच गोष्टींचे पालन करा !

by प्रभात वृत्तसेवा
September 13, 2022
in आरोग्य वार्ता
A A
पालकांनो, मुलांचे ‘बेस्ट फ्रेंड’ होण्यासाठी ‘या’ पाच गोष्टींचे पालन करा !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पालक आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. त्यांना मुलांच्या भविष्याची काळजी वाटते. लहान वयातच मुलं आई-वडिलांच्या जवळ असतात आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करतात, पण जसजशी मुलं मोठी होतात तसतशी ते त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये, शाळा, कॉलेजमध्ये व्यस्त होतात. मुले त्यांच्या पालकांसोबत गोष्टी शेअर करणे बंद करतात. 

कधीकधी मुले पालकांपासून गोष्टी लपवतात किंवा खोटे बोलू लागतात. अशा वेळी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण केले पाहिजे.  जेव्हा मुलं आपल्या पालकांना मित्र मानू लागतात, तेव्हा ते त्यांच्याशी सर्व प्रकारच्या गोष्टी शेअर करतात. मुले आणि पालक यांच्यातील मैत्रीच्या नातेसंबंधात खोटे बोलणे किंवा गोष्टी लपविण्याची शक्यता कमी असते.

अशा परिस्थितीत पालकांना आपल्या मुलांचे बेस्ट फ्रेंड व्हायचे असेल तर काही गोष्टी त्यांनी मुलांना सांगायला हव्यात. मित्र होण्यासाठी पालक मुलांना सांगू शकतील अशा गोष्टी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

मुलांची प्रशंसा करा

तुमच्या मुलाला स्वतःबद्दल विशेष वाटू द्या आणि त्यांना आनंदी ठेवा. जेव्हा तुम्ही मुलाची थोडी प्रशंसा करता तेव्हा ते मूल आनंदी होते आणि स्तुती ऐकण्यासाठी तुम्हाला सर्व काही सांगू लागते.

चुका साध्या शब्दांत सांगा

मुलाच्या चुकांवर ओरडण्याऐवजी त्याला आरामात, साध्या सोप्या भाषेत समजावून सांगा. हे लक्षात ठेवा की मूल चुकांमधून शिकते. जेव्हा तुम्ही एखाद्या चुकीबद्दल मुलाला शिव्या देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा तो पुढच्या वेळी चूक होऊ नये म्हणूनही प्रयत्न करतो.

परवानगी विचारा

मुलांना स्पेस द्या. पालकांनी त्यांच्या कोणत्याही कामासाठी मुलांची परवानगी घ्यावी. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या मुलाला काही कामात मदत करायची असेल किंवा त्यांच्या खोलीत यायचे असेल तर आधी त्यांना विचारा. यातून त्याला स्वतःचे महत्त्व लक्षात येईल.

मुलांना अडचणींबाबत विचारा

अनेकदा मुलांना काही अडचणी अथवा समस्या येऊ शकतात. अशावेळी स्वतःला दोष देण्यापेक्षा किंवा विचार करण्यापेक्षा मुलाला काही समस्या असल्यास त्यांना मोकळेपणाने विचारणे चांगले. त्यांना कोणी काही त्रास देत आहे का? याबाबत हळुवारपणे विचारा.

मुलांचे आभार माना

पालक अनेकदा आपल्या मुलांना आपली काही कामं करायला सांगतात. मुलांनी तुमची छोटी-मोठी कामं केलेली असतील तर मुलांचे आभार माना. तसेच मुलांच्या कामाचे कौतुक करा.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar