Saturday, March 7, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पालकांची चिंता मिटणार! आता गुगलचं ठरवणार लहान मुलांनी काय पाहायचं आणि काय नाही?; ‘असे’ असेल नवीन फिचर

by प्रभात वृत्तसेवा
August 13, 2021
in लाईफस्टाईल
A A
पालकांची चिंता मिटणार! आता गुगलचं ठरवणार लहान मुलांनी काय पाहायचं आणि काय नाही?; ‘असे’ असेल नवीन फिचर
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली : देशात करोनाचा काळ सुरु झाल्यापासून लहान मुलांवर यांचा मोठा परिणाम झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. मग तो परिणाम मानसिक असो किंवा शैक्षणिक असो याचे परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या काळात लहान मुलांचा मोबाईलचा वापर  जास्त करण्यात येत आहे. त्यामुळे आपली मुलं नेमकं मोबाईलवर काय पाहतात याची चिंता नेहमी पालकांना भेडसावत  असते. मात्र आता पालकांची हीच चिंता गुगलने दूर केली आहे.

गुगल येणाऱ्या काही महिन्यात 18 वर्षाहून कमी वयोगटातील युजर्ससाठी अनेक बदल करणार आहे. कंपनी गुगल अकाउंट्सबाबत बदल करणार आहे, जेणेकरुन लहान मुलांना ऑनलाईन फ्रॉडपासून वाचवलं जाईल. अनेक पालक मुलांमध्ये वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे काळजीत आहेत. त्यामुळे गुगलच्या या निर्णयामुळे आता पालकांना काहीसा दिलासा  मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टेक कंपनी गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली. कंपनी संवेदनशील कॅटेगरीतील जाहिराती अल्पवयीन मुलांना दाखवण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचा विस्तार करेल, असे कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.

कंपनी 18 वर्षाहून कमी वय असलेल्यांसाठी लिंगाच्या आधारे जाहिरातींवर रोख लावेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काही महिन्यात जागतिक स्तरावर हे अपडेट रोल आउट करण्यास सुरू करणार आहे.  गुगलवर जाहिरातींसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करणे हे लक्ष्य असून वयानुसार जाहिराती दाखवण्यात येणार आहेत.

नियमानुसार, 13 वर्षाखालील मुलं एक स्टँडर्ड गुगल अकाउंट बनवू शकणार नाहीत. त्यांना लिमिटेड फीचर्ससह गुगल अकाउंट वापरण्याची सूट मिळेल. उदा. आता 13 ते 17 वर्ष वयोगटातील मुलं YouTube डिफॉल्ट अपलोडचा वापर करू शकतील.

गुगल मुलांच्या सेफ्टीसाठी सेफ सर्च  नावाचे फीचर आणणार आहे. यात मुलांचे गुगल अकाउंट कुटुंबियांसह लिंक असेल, ज्यात 13 वर्ष वयोगटातील मुले साइन-इन करू शकतील. ते काय सर्च करतात, याची माहिती पालकांनाही मिळत राहील.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar