एक असा काळ होता, जेव्हा दागिन्यांवर राजे राजवाडे आणि संस्थानिकांचाच मक्ता आहे, असा समज होता. काळासोबत हे दागिने आणि त्यांची डिझाईन्स दुर्मीळ होत गेली. ‘रांका ज्वेलर्स’तर्फे सादर करण्यात आलेल्या ‘क्रांतीनारी’या चांदीच्या दागिन्यांच्या कलेक्शनद्वारे काळाच्या पडद्याआड गेलेल्या अशा असंख्य दागिन्यांना आणि डिझाईन्सना नवा जन्म देण्यात आला आहे. इतकंच नाही, तर चांदीमध्ये घडवलेल्या असंख्य डिझाईन्समुळे प्रत्येक ग्राहकाला स्वत:ला साजेसं डिझाईन निवडणं शक्य होणार आहे.
आजच्या युगातील स्त्रियांची आवड निवड लक्षात घेऊन सादर केले गेलेल्या कलेक्शनमधील दागिने हे बोल्ड आणि ट्रेंडी आहेत. पण त्याचबरोबर समारंभ, ऑफीस, पार्टीज अशा विविध प्रकारच्या प्रसंगांसाठी आणि कपड्यांनाही साजेसेच आहेत. पारंपरिक कारागिरांकडूनच हे दागिने घडवून घेतल्यामुळे या दागिन्यांची डिझाईन्सही तशीच पारंपरिक व आधुनिक डिझाईन्सचे मिश्रण आहे. त्याचप्रमाणे नव्या पिढीला त्यांच्या ड्रेसवर साजेसे व त्यांची सुंदरता वाढविणारी अत्याधुनिक दागिन्यांची शृंखला म्हणजेच क्रांतिनारी कलेक्शन. अवघ्या अडीच हजारांपासून सुरू होणाऱ्या किमतीमुळे हे दागिने घेणे सर्वांसाठीच सोयीचं आहे.
प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी संपादन केलेलं यश आणि शिक्षण असो वा करियर, सर्वच बाबतीत त्यांचे उजवेपण लक्षात घेऊन या कलेक्शनला ‘क्रांतीनारी’हे नाव देण्यात आलं आहे. आजच्या युगामध्ये स्त्रियांनी गाजवलेल्या कर्तृत्वाला हे एका प्रकारचे अभिवादनच आहे, असं रांका ज्वेलर्सतर्फे सांगण्यात आले. क्रांतिनारी दागिन्यांमुळे स्रियांच्या सुंदरतेत नक्कीच भर पडणार आहे.
विविध प्रकारच्या दागिन्यांच्या असंख्य डिझाईन्स हे या कलेक्शनचे वैशिष्ट्य असणार आहे. सदर कलेक्शन रांका ज्वेलर्सच्या रविवार पेठ, लक्ष्मी रोड, कर्वे रोड, पिंपरी चिंचवड, हडपसर, सिंहगड रोड, बाणेर, सातारा रोड, बंडगार्डन, रहाटणी (पिंपळे सौदागर), कोंढवा, आणि ठाणे – राम मारुती रोड येथील सर्व दालनांमध्ये एकाचवेळी उपलब्ध असणार आहे. ग्राहकांनी एकदा भेट देऊन हे दागिने नक्की पहावेत असं आवाहन रांका ज्वेलर्स तर्फे करण्यात आलं आहे.