पादहस्तासन हे एक शयन स्थितीतील आसन आहे. हे आसन करताना जमिनीवर पाठीवर झोपावे. हळूहळू श्वास घेत दोन्ही पाय जुळवून सावकाश उचलावेत. नंतर दोन्ही हात व डोके उचलावे. मग हाताने पायाचे अंगठे पकडावेत. श्वास संथ करावा. ही क्रिया श्वास घेत घेत एकाच वेळी करता आली तर उत्तम नाही तर स्टेप बाय स्टेप करावी. मग हात आणि पाय दोन्ही एकत्र मिळवून चांगले ताणावेत. आता पायाच्या दिशेने डोके नेण्याचा प्रयत्न करावा. हे करत असताना गुडघे वाकायची शक्यता असते पण पाय गुडघ्यामध्ये ताठ ठेवावेत. या स्थिती जमेल तितका वेळ थांबावे. आसनस्थिती घेतल्यानंतर श्वसन संथ ठेवावे. मनातल्या मनात दहा आकडे मोजावेत.
आसन सोडताना श्वास सोडत -सोडत हळूहळू सावकाश हात आणि पाय जागेवर न्यावेत. शयनस्थिती घेऊन शरीर ढिले सोडावे. पादहस्तासन हे करायला सोपे असले तरी विशिष्ट वयानंतर हे आसन जमेनासे होते. म्हणून जेष्ठांनी योगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे. या आसनाच्या नियमित सरावामुळे कंबरदुखी दूर होते. तसेच रोज पादहस्तासन केल्यामुळे शरीराला लवचिकता प्राप्त होते सरावाने हे आसन जमू शकते. या आसनामुळे पार्श्वभागावर ताण येतो व तेथील चरबी घटण्यास मदत होते. तसेच पाठीचा मणका आणि हाडांना बळकटी येते. व लवचिकता प्राप्त होते.
आसनस्थिती श्वास दीर्घ, संथ केल्यामुळे हृदयालासुद्धा विश्रांती मिळते. त्यामुळे ब्लॉकेजेस् कमी व्हायला मदत होते. रोज नियमित आसन केल्यामुळे पोटाची चरबी कमी होते व पोट हलके बनते. तसेच पचनशक्ती सुधारते. पोटाचे अपचनासारखे रोग बरे होतात. हात आणि पाय मजबूत होतात कारण हातापायांवर ताण आलेला असतो. स्त्रियांची काम करण्याची शक्ती तसेच पुरूषांची वीर्यशक्ती वाढवणारे हे आसन आहे.हे आसन नियमित करताना योगशिक्षकाचे मार्गदर्शन घ्यावे. कालावधी 15 सेकंदानी पुढे वाढवता येतो.
error: Content is protected !!