Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पब्जी, बीजीएमआय मेकर कंपनी भारतात लॉन्च करणार दोन नवीन मोबाइल गेम्स! जाणून घ्या काय असेल खास ?

by
November 28, 2022
in लाईफस्टाईल
A A
पब्जी, बीजीएमआय मेकर कंपनी भारतात लॉन्च करणार दोन नवीन मोबाइल गेम्स! जाणून घ्या काय असेल खास ?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

क्राफ्टन (Krafton) ही कंपनी जी पब्जी (PUBG) आणि बीजीएमआय (Battleground Mobile India) मोबाइल गेम्स विकसित आणि सादर करते, लवकरच भारतात दोन नवीन गेम रिलीज करण्याची तयारी करत आहे. असा दावा केला जात आहे की कंपनी एक गेम या वर्षी 2 डिसेंबरला आणि दुसरा गेम पुढील वर्षी लॉन्च करणार आहे. कंपनी भारतासह जागतिक स्तरावर कॅलिस्टो प्रोटोकॉल आणि डिफेन्स डर्बी या नावांनी हे गेम्स सादर करणार आहे. क्राफ्टनच्या आधी PUBG आणि नंतर BGMI मोबाईल गेमवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. मात्र, क्राफ्टनचा न्यू स्टेट मोबाईल गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियाचा गेम डेव्हलपर क्राफ्टन आपला नवीन गेम ‘द कॅलिस्टो प्रोटोकॉल’ 2 डिसेंबर रोजी भारतासह जागतिक बाजारपेठेत रिलीज करणार आहे. हा गेम पीसी आणि गेमिंग कन्सोलसाठी रिलीज केला जाईल, जो क्राफ्टनच्या स्ट्राइकिंग डिस्टन्स स्टुडिओने विकसित केला आहे. आणि डिफेन्स डर्बी मोबाईल गेम पुढील वर्षीच्या सुरुवातीला रिलीज होईल. हा एक मोबाईल गेम आहे आणि तो क्राफ्टनच्या रायझिंग विंग स्टुडिओने विकसित केला आहे.

हे दोन्ही गेम बॅटलग्राउंड आणि रॉयल स्टाइल गेम PUBG आणि BGMI पेक्षा पूर्णपणे वेगळे असणार आहेत. वास्तविक, कॅलिस्टो प्रोटोकॉल हा सर्व्हायव्हल हॉरर गेम आहे. हे कॅलिस्टोवर आधारित आहे, म्हणजेच गुरु ग्रहाचा दुसरा सर्वात मोठा चंद्र आणि या गेममध्ये खेळाडू जेकब लीची भूमिका साकारतील. दुसरीकडे, मोबाइल गेम डिफेन्स डर्बी हा रिअल-टाइम स्ट्रॅटेजी डिफेन्स गेम आहे, जेथे गेम खेळाडू विरुद्ध खेळाडूंच्या आधारावर कार्य करतो.

2020 मध्ये, भारत सरकारने Crafton च्या PUBG गेमवर भारतात बंदी घातली. यानंतर, कंपनीने हा गेम एका वर्षानंतर 2021 मध्ये नवीन अवतार आणि नवीन नावासह (Battlegrounds Mobile India) सादर केला. तथापि, ऑगस्ट 2022 मध्ये, Crafton च्या गेमवर भारतात पुन्हा बंदी घालण्यात आली. या बंदीनंतर कंपनीने लवकरच भारतात परतणार असल्याचे सांगितले होते.

The post पब्जी, बीजीएमआय मेकर कंपनी भारतात लॉन्च करणार दोन नवीन मोबाइल गेम्स! जाणून घ्या काय असेल खास ? appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar