नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक आजार टाळण्यासाठी सुरक्षित सेक्ससाठी लोक जोडीदाराबरोबर शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करतात.
मात्र कंडोमचा वापर करूनही चीनमध्ये एका व्यक्तीची पत्नी गरोदर राहिली. या व्यक्तीच नाव वांग असून जेव्हा त्याने या कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या विरोधात रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये तक्रार केली तेव्हा त्याच्यासमोर अजब अट ठेवण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणाबाबत त्याने सांगितले की,’आम्हाला आधीच दोन मुलं आहेत.आम्हाला तिसरे बाळ नको होते त्यामुळे आम्ही संबंध ठेवताना कंडोमचा वापर करण्याचा निर्णय घेतला. यानंतर जेव्हा मी कंडोम काढलं तेव्हा असे लक्षात आले की ते कंडोम खराब होते त्याला १ ते २ छिद्र होते. यानंतर मी याबाबत पत्नीला सांगतिले आणि ती गर्भवती राहू शकते, या शंकेने मी लगेचच पत्नीला याबाबत माहिती दिली.’
तीला मी गर्भनिरोधक गोळीही दिली. मात्र, गोळीही काही काम करू शकली नाही. मी या संपूर्ण घटनेबाबत रेग्युलेटरी अथॉरिटीकडे तक्रार केली मात्र त्यांनी तेव्हा माझ्या समोर अजब अट ठेवण्यात आली. मी कंडोमची क्वालिटी तपासबाबत तक्रार केली होती. तेव्हा अथॉरिटीच्या व्यक्तीने मला सांगितले की,’ या प्रकरणाचा तपास तेव्हाच केला जाईल, जेव्हा वांग हे सिद्ध करू शकतील की त्यांना कंडोमचा योग्य वापर कसा करायचा हे माहिती आहे.’ असेही त्यांनी सांगतल दरम्यान , अथॉरिटीनं योग्य कारवाई न केल्यास आपण कोर्टात जाऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.