या झाडाच्या पोडोफिलम या शास्त्रीय नावावरून व्यावहारिक नाव घेण्यात आले आहे.
हिमालयाच्या उंच, आतील पर्वत रांगांमध्ये सामान्यत: 3000 ते 4000 मीटर उंचीवर हे झाड सापडते. काश्मिरमध्ये ते 1800 मीटर उंचीवर सापडते.
सरळ-ताठ, रसदार वनस्पती, जमिनीत पसरत जाणारे मूलस्तंभ;
फुलांच्या फांद्या टोकास, पाने असलेल्या व सरळ ताठ; पाने दोन, 15-25 से.मी. परिघाची, खोलवर 3-5 पाळ्यांत विभागलेली, दातेरी, जांभळे ठिपके असलेली; फुले 2.5- 5 से.मी. परिघाची, पांढरी किंवा गुलाबी, कपाच्या आकाराची, बहुधा एक – एक; फळ अंडाकृती, 2.5 से.मी. शेंदरी.
उपयुक्तता :
झाडाची वाळवलेली मूलस्तंभे औषध म्हणून वापरतात. मूलस्तंभामध्ये “पोडोफायलिन’ नावाचे रेझिन असते. ते रेचक असते त्याचा प्रभाव हळूहळू पण तीव्र असतो आणि जास्त प्रमाणात घेतल्यास पोटात तीव्र आग-आग होते व मुरडा येतो. पोडोफिलम औषध बहुधा बेलाडोना किंवा कोरफडीबरोबर मिश्रण करून देण्यात येते.
पोडोफिलम अनेक त्वचारोगात आणि गाठींच्या वाढीत उपयोगी असल्याचे सांगण्यात येते.
कर्क रोगातील ऊती बऱ्या करण्यासाठी वापर करण्याबाबतचे संशोधन चालू आहे.
पोडोफिलम पेल्टॅटम ही पोडोफिलम या प्रजातीची अमेरिकन जाती काही वेळा लावली जाते. काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश आणि सिक्कीमचे हिमालयातील 1500 ते 3000 मीटर उंचीवरचे पर्वतमय भाग या जातीच्या लागवडीसाठी योग्य असल्याचे समजण्यात येते.