Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पक्षाघातावर सर्वोत्तम उपाय

by
December 1, 2022
in फिटनेस
A A
पक्षाघातावर सर्वोत्तम उपाय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जीवनातील वाढता ताणतणाव, जीवनशैली आणि आहारातील असमतोल यामुळे विविध आजारांचा धोका वाढत आहे. पक्षाघाताची वाढती समस्या हे यामागचे एक कारण मानले जाते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, मेंदूच्या एखाद्या भागाला ऑक्‍सिजनयुक्‍त रक्ताचा सतत पुरवठा प्रभावित झाल्यास स्ट्रोक येतो. सहसा अशी स्थिती मेंदूला रक्‍तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमधील अडथळ्यामुळे उद्‌भवते.

पक्षाघाताची समस्याही अनेक परिस्थितींमध्ये घातक ठरू शकते. जीवनशैलीत बदल करून या प्रकारच्या समस्येचा धोका कमी केला जाऊ शकतो. त्यासाठी योगा आणि व्यायामाचा नित्यक्रमात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. योगामुळे संपूर्ण आरोग्य सुधारण्यास आणि पक्षाघाताचा धोका कमी होण्यास मदत होते.

कपालभाती प्राणायाम
मेंदूचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी प्राणायामचा सराव करणे अत्यंत आवश्‍यक मानले जाते. यामध्येही कपालभाती प्राणायाम विशेष फायदेशीर मानला जातो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्यांना पक्षाघाताचा धोका आहे किंवा लक्षणे दिसतात अशा लोकांसाठी दररोज हा योगासन खूप फायदेशीर ठरू शकतो. हे मेंदूच्या पेशी निरोगी राखण्यासोबतच रक्ताभिसरणाला चालना देते.

भुजंगासन
भुजंगासन किंवा कोब्रा पोझ हा एक व्यायाम आहे जो मेंदूची योग्य कार्ये राखण्यास मदत करतो. मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्‍ताभिसरण वाढवण्यासाठी हे योग आसन विशेष फायदेशीर मानले जाते. आरोग्यतज्ज्ञ स्मरणशक्तीशी संबंधित समस्यांसाठी भुजंगासनाच्या सरावाची शिफारस करतात.

धनुरासन
स्वादुपिंडासह पोटाच्या सर्व समस्यांचा धोका कमी करण्यासोबतच मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी धनुरासनाचा सराव फायदेशीर मानला जातो. स्ट्रोकच्या जोखमीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी धनुरासनाचा नियमित सराव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा योग करण्यासाठी, प्रथम तुम्हाला पोटावर झोपावे लागेल आणि आपले गुडघे आपल्या नितंबांकडे वाकवावे लागतील. आता तुमचे घोटे तुमच्या हातांनी धरा. आता तुमचे पाय आणि हात शक्‍य तितके उंच करा आणि तुमचा चेहरा वर ठेवा. या पोझमध्ये जास्तीत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करा.

ताडासन
ताडासन किंवा माउंटन पोज, शरीराच्या सर्व स्नायूंना ताणते. या योगाचा नियमित सराव मेंदूला निरोगी ठेवण्यासाठीही फायदेशीर मानला जातो. हे योगासन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा, हात सरळ ठेवा. दीर्घ श्‍वास घेऊन दोन्ही हात डोक्‍याच्या वर उचला आणि बोटे जोडून ताणून घ्या. शरीराचे वजन बोटांवर ठेवा. काही सेकंद या स्थितीत रहा.

The post पक्षाघातावर सर्वोत्तम उपाय appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar