Dwarka Darshan In the sea : द्वारकेची प्रसिद्ध गोष्ट कोणती? हा प्रश्न भारतातील कोणालाही विचारताच उत्तर मिळेल द्वारकाधीश मंदिर. द्नारकाही श्रीकृष्णाची राजधानी होती आणि शतकानुशतके भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वी सोडल्यानंतर हे शहर समुद्रात बुडाले. द्वारकाधीश मंदिर मूळतः त्यांचा नातू वज्रनाभ याने प्राचीन द्वारकेतील हरिगृह या त्यांच्या निवासस्थानी बांधले होते असे मानले जाते. हे हिंदू पौराणिक कथांमधील प्रसिद्ध चार धामांपैकी एक आहे आणि ते गोमती नदीच्या काठावर बांधले गेले आहे.
याशिवाय हे शहर अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्याला लागून आहे. या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही येथे जाण्याची उत्सुकता वाटत असेल, तर पुढील माहिती जाणून घेऊन तुम्हीही या ठिकाणी जाण्यासाठी प्लॅन करू शकता.
अहमदाबाद-जामनगर आणि मग द्वारका
अवघ्या देशभरातून द्वारकेला दर्शनासाठी भाविक येत असतात महाराष्ट्रातून गुजरातमधील द्वारकेला जाण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट बस.. ट्रेन तसेच फ्लाईटची देखील सोय आहे. यामुळे तुम्ही थेट द्वारकेला पोहचणार नाहीत पण गुजरातमधील अहमदाबादपर्यंत पोहचाल त्यानंतर तुम्हाला जामनगराला पोहचलायचे आहे तेथून तुम्ही थेट द्वारकेला जाऊ शकाल.
1 दिवसात कुठे फिरू शकता ? Dwarka Darshan In the sea
जर तुमच्याकडे द्वारकेला जाण्यासाठी फक्त 1 दिवसाचा वेळ असेल तर तुम्ही श्री द्वारकाधीश मंदिर आणि श्री कृष्ण मंदिर, तुला मंदिर, गोमती घाट, द्वारका येथे भेट देऊ शकता. परंतु जर तुम्ही द्वारकेच्या बाहेर जाण्याचा विचार केला तर यास जास्त वेळ लागू शकतो. | Dwarka Darshan In the sea
समुद्रातील द्वारकेचा दर्शन कसे कराल ?
हे पाहण्यासाठी तुम्हाला बेट द्वारका नावाच्या ठिकाणी जावे लागेल जे समुद्रकिनारी आहे आणि मुख्य द्वारका शहरापासून 25 किमी अंतरावर आहे. येथे हे मंदिर सकाळी 6 ते दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 पर्यंत उघडते. येथे स्कुबा डायव्हिंगद्वारे लोकांना समुद्रात नेले जाते आणि प्राचीन द्वारकेचे अवशेष दाखवले जातात. | Dwarka Darshan In the sea
द्वारकेत भेट देण्याची ठिकाणे
श्री द्वारकाधीश मंदिर
भडकेश्वर महादेव मंदिर
श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग
रुक्मिणी देवी मंदिर
गोमती घाट द्वारका
सुदामा सेतू पूल
स्वामीनारायण मंदिर द्वारका
द्वारका दीपगृह
द्वारका बीच
समुद्र नारायण मंदिर द्वारका
डनी पॉइंट-बेट द्वारका
गीता मंदिर
गायत्री शक्तीपीठ
श्री रुक्मिणीदेवी द्वारकाधीश धाम, इस्कॉन मंदिर. तर, एकदा प्लॅन करा आणि द्वारकेला भेट द्या.
The post पंतप्रधान ‘द्वारका दर्शना’साठी पाण्याखाली गेले ! श्री कृष्णाच्या समुद्रातील द्वारकेच दर्शन तुम्हीही घेऊ शकता.. असा करावा लागेल प्रवास appeared first on Dainik Prabhat.