Saturday, August 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

’पंच’-टाटा मोटर्सची आगामी एसयूव्ही ! – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
October 20, 2021
in लाईफस्टाईल
A A
’पंच’-टाटा मोटर्सची आगामी एसयूव्ही ! – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

ऑटो एक्सपो 2020 मध्ये ‘एचटूएक्स’ या महत्वाकांक्षी संकल्पनेच्या सादरीकरणानंतर, टाटा मोटर्स आता आपल्या एसयूव्ही लाइनअपमध्ये नवीन ट्रेंड आणण्याच्या तयारीत आहे.

कंपनीने या बहुप्रतीक्षित एसयूव्हीला ’पंच’ असे नाव दिले आहे. राष्ट्रातील अग्रेसर कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने या सणासुदीच्या काळाचे औचित्य साधून आज अधिकृतपणे ‘पंच’चे अनावरण केले. अल्फाआर्क (एजिल लाइट फ्लेक्सिबल ॲडव्हान्स आर्किटेक्चर) वर आधारित असलेल्या व इम्पॅक्ट 2.0 डिझाइन भाषेत विकसित केल्या गेलेल्या ही एसयूव्हीची आज टाटा मोर्टसद्वारे अधिकृत सादरीकरण करण्या आले.

आधुनिक युगात वावरणाऱ्या पुढच्या पिढीसाठी डिझाइन केलेली ही टाटा ’पंच’ एक तडजोड न करणारी एसयूव्ही आहे, ज्यामध्ये एसयूव्हीच्या अद्वितीय मजबूतीसह स्पोर्टिंग डायनॅमिक्सचा अद्भुतसंगम आहे. यामुळेच एक वैशिष्ट्‌यपूर्ण एसयूव्ही कशी असावी याचे हे एक सर्वोत्तम प्रतीक आहे. धाडस, तारूण्य, आधुनिक तरीही मजबूत, कॉम्पॅक्ट तरीही व्यावहारिक, शक्तीशाली तरीही खेळकर अशी सर्व गुणवैशिष्ट्ये यामध्ये आहेत, जी आत्मविश्वास आणि स्वयंनिर्भरता दर्शवितात.

‘टाटा पंच’ ही शहरी रस्त्यांवरील गर्दीमध्येही आनंदाचा प्रवास घडविणारी एसयूव्ही आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण व दुर्गम भागातील वळणदार व खडबडीत रस्त्यांवरही प्रवासाची खरी मजा देणारी कार आहे. एसयूव्ही प्रेमींना हवे असणारे पुरेसे केबिन स्पेस, उत्तम ड्रायव्हिबिलिटी, या श्रेणीतील अग्रगण्य सुरक्षा आणि खऱ्या एसयूव्हीची पॉवर पॅक ही सारी वैशिष्ट्ये यामध्ये आढळतात.

ही एक अष्टपैलू कार असून कुठेही जाण्यासाठी उच्च आसन स्थिती आणि गतिशील एसयूव्ही डिझाइन असल्यामुळे सर्व एसयूव्ही प्रेमींसाठी एक सर्वोत्तम निवड आहे. तुम्हांला हवी असणारी सर्व फिचर्स असलेली आणि डायनॅमिक, स्टाईलिश व शहरी ट्रेंड असलेली ‘टाटा पंच’ ही एसयूव्ही ग्राहकांना यापूर्वी कधीही अनुभवलेली नसेल अशा अद्वितीय गुणवत्तेचे सादरीकरण प्रदान करते.

या बहुप्रतिक्षित एसयूव्हीचे अनावरण करताना, श्री शैलेश चंद्रा – अध्यक्ष, पॅसेंजर व्हेइकल बिझनेस युनिट, टाटा मोटर्स म्हणाले – टाटा पंच, नावाप्रमाणेच कुठेही जाण्याची क्षमता असलेले ऊर्जावान वाहन आहे. पायाभूत सोयींवर प्रकाशझोत टाकणारी आणि त्याच्या ताकदीमध्ये शक्तीशाली असणारी ही एसयूव्ही म्हणजे तिच्या वजनापेक्षाही अधिक अद्भुत असा ‘पंच’ आहे. आश्चर्यकारक डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अद्भुत ड्रायव्हिंग डायनॅमिक्सचे परिपूर्ण मिश्रण, सर्वोत्कृष्ट फिचर्स आणि आर्किटेक्चर तसचे सर्व दृष्टीकोनातून आपले अष्टपैलुत्व सिद्ध करणारी ही कार आहे.

टाटा मोटर्सच्या सर्व उत्पादनांमध्ये असलेला एसयूव्ही घटक असणारी आणि खऱ्या एसयूव्हीची वैशिष्ट्ये लाभलेल ही कार, कॉम्पॅक्ट सिटी कारच्या शोधात असलेल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज असून, आमच्या एसयूव्ही कुटुंबामधील चौथी श्रेणी असेलली अशी ही ‘पंच’ आहे.

कॉम्पॅक्ट फूटप्रिंटमध्ये कुशल बुध्दिमत्तेद्वारे डिझाइन केलेली टाटा पंच एक उच्च प्रभाव असलेली एसयूव्ही असेल आणि या गर्दीच्या मार्केटची सर्व समीकरणे बदलेल. पीळदार पृष्ठभाग आणि ॲथेलेटिक लुकमुळे टफ एसयूव्हीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर पोहचणारी ही कार आहे. वजनाला हलकी, मॉड्यूलर आणि लवचिक वैशिष्ट्‌यांसह, अल्फा आर्किटेक्चरमध्ये लघू विकास चक्रात आधुनिक आणि नव्या वाहनांच्या श्रेणीमध्ये विकसित होण्याची क्षमता या कारमध्येआहे. एसयूव्ही श्रेणीची नव्याने व्याख्या करण्यासाठी निर्माण झालेली ‘पंच’ ही एसयूव्ही या सणासुदीच्या काळात बाजारात दाखल होण्यासाठी आणि स्वतःचे एक वेगळे स्थान तयार करण्यासाठी सुसज्ज झालेली आहे.

याप्रसंगी टाटा मोटर्सने ’पंच’ ब्रँडच्या डिजिटल फूटप्रिंट्सची घोषणा देखील केली. ग्राहक समर्पित ब्रँड सोशल मीडिया हँडल tatapunchofficial वर फॉलो करू शकतात किंवा https://cars.tatamotors.com/suv/punch येथे वेबसाइटला भेट देऊ शकतात.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar