New Year Celebration Plan : देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट पसरण्यास सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या JN.1 या नवीन प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता ख्रिसमस आणि नवनर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी ख्रिसमस आणि नवनर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. मात्र जगभरातील अनेक देशांमध्ये COVID -19 च्या JN.1 प्रकाराने संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र पाहता चिंता अधिकच वाढली आहे.
भारतात देखील COVID -19 च्या JN.1चे रुग्ण आढळले आहेत. यातील केरळमध्ये या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत राज्यांना अलर्ट जारी केला आहे. पण तुम्ही सुद्धा ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्याचे प्लान करत असाल तर गर्दीत जाण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊयात.
कोरोनाच्या JN.1 ची लक्षणे कोणती?
ताप
थकवा
नाक वाहणे
घशात खवखव
डोकेदुखी
खोकला
गर्दीत जाताना काय काळजी घ्याल?
सर्दी, खोकला, घसादुखी, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
गर्दीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
गर्दीत जात असाल तर मास्कचा वापर करा.
नियमित २० सेकंद हात स्वच्छ पाणी घेऊन हात धुवावे
साबण व पाणी नसल्यास, ६० टक्के अल्कोहोल असणाऱ्या सॅनिटायझरचा वापर
नाक आणि तोंड मास्कने व्यवस्थित झाकणे
आहारात प्रोटीन आणि व्हिटॅमिन पुरेसा प्रमाणात खा.
कोरोनाचा हा नवा वेरिएंट आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असून अमेरिका, ब्रिटन, आईसलँड, स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड आणि चीनमध्ये पसरत आहे. त्यानंतर आता भारतामध्येही यातील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून देखील सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
The post न्यू इयर सेलिब्रेशनचं प्लान करताय? गर्दीत जाताना कोरोनाच्या JN.1 बाबत अशी घ्या काळजी appeared first on Dainik Prabhat.