लंडन – गेल्या काही वर्षांमध्ये जगात सर्वत्रच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जगातील प्रत्येक व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करीत असते आणि हा वापर करत असताना मोबाईल किंवा इतर उपकरणे वापरली जात असतात. या सर्व गोष्टींमुळे गेल्या काही वर्षांमध्ये मानसिक ताण तणाव नैराश्य या रोगांमध्ये वाढ झाली आहे. आता नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे जर लोकांनी एक आठवडाभर सोशल मीडियापासून ब्रेक घेतला तर त्यांना नैराश्य आणि मानसिक ताणतणावापासून मुक्ती मिळू शकते.
या विषयाचा अभ्यास करणारे आरोग्य तज्ञांनी या प्रक्रियेला डिजिटल डिटॉक्स असे नाव दिले आहे. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ बाथ येथील संशोधकांनी याबाबत संशोधन केले असून त्याचा लेख नुकताच प्रसिद्ध झाला आहे. लेखात संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ज्याप्रमाणे लोकांना मद्य किंवा अमली पदार्थांचे व्यसन लागते त्याच प्रकारचे व्यसन त्यांना सोशल मीडिया वापरण्याचे ही लागत असते.
त्यामुळे विविध प्रकारचे मानसिक आणि शारीरिक रोग जडत असतात. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी ठराविक कालावधीनंतर किमान एक आठवड्याचा ब्रेक जर घेतला तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारणा होऊ शकते असा या संशोधकांचा दावा आहे.
संशोधकांनी 18 ते 72 या वयोगटातील सुमारे दोनशे लोकांवर संशोधन करून हे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. या लोकांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले होते. दोन्ही गटातील लोकांना प्रथम सोशल मीडियाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली होती त्यानंतर एका गटातील लोकांना सोशल मीडियापासून ब्रेक घेण्यात सांगण्यात आले होते. त्यानंतर या दोन्ही गटातील लोकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य तपासल्यानंतर सोशल मीडिया पासून ब्रेक घेतला होता त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले असल्याचे लक्षात आले.
error: Content is protected !!