नैराश्याची कारणे काय ?
June 28th, 7:44amJune 27th, 3:19pm
प्रभात वृत्तसेवाआरोग्य जागर
एखादी अप्रिय घटना घडल्यावर उदास वाटणे स्वाभाविक असते; परंतु सतत काही महिने नैराश्याची एकच भावना जाणवत असल्यास डिप्रेशन ही मानसिक समस्या अथवा आजार उद्भवू शकतो. ताण व चिंतेचे भावंडं म्हणजे डिप्रेशन असे म्हणता येईल.
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक स्पर्धांना मनुष्याला सामोरे जावे लागते, त्यातून बरेचवेळा स्वतःकडून तसेच नकळतपणे इतरांकडून अवाजवी अपेक्षा ठेवल्या जातात व हे नैराश्याचे महत्त्वाचे कारण बनते.
कौटुंबिक जबाबदाऱ्या, कामाच्या ठिकाणचे ओझे, सतत कृत्रिम आनंद शोधण्यासाठी चाललेली धडपड अशा एक ना अनेक गोष्टींचा ताण घेऊन व्यक्ती वावरत असतात व या ताणाचा निचरा न झाल्याने त्याचे रूपांतर चिंतेत होते व ओघानेच नैराश्याची निर्मिती होते. याचबरोबर सतत भूतकाळातील नको असलेल्या आठवणींमध्ये राहिल्याने नैराश्य येते.
बहुतांशी वेळा हल्ली अनेकांचे व्हॉट्सऍप, फेसबुक स्टेटस बघितल्यास त्यावर फिलिंग डिप्रेस्ड हे सहजपणे लिहिलेले दिसते; परंतु येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे; “जगी सर्व सुखी असा कोण आहे; विचारी मना तूची शोधून पाहे’ जगात कोणतीच व्यक्ती चोवीस तास आनंदी अथवा सुखाच्या भावनेत वावरत नसते. अधूनमधून थकवा, कंटाळा, भीती, उदासीनता या भावनांची मनात ये-जा सुरू असते; परंतु याचा अर्थ आपण डिप्रेशन अथवा नैराश्यात आहोत असा होत नाही. सुख हे जवा एवढे दिसते परंतु नको असलेल्या भावना ज्या दुःखद भासतात त्यांचा अति बाऊ केल्यामुळे व्यक्ती लगेच उदास होते; परंतु सलग चार ते सहा महिने उदासीनतेची भावना व नैराश्याची लक्षणे जाणवत असतील तर मात्र व्यक्ती नैराश्यात असण्याची दाट शक्यता असते.
नैराश्याची कारणे
प स्वतःला कमी लेखणे प न्यूनगंड प एखादी दुःखद घटना घडणे
प स्वतःकडून अवाजवी अपेक्षा करणे
प नकार न पचवता येणे प सोशल मीडियाचा अति वापर प व्यसने प सतत येणारा ताण प अनुवंशिकता
नैराश्याची लक्षणे
प सतत काही महिने नैराश्याची भावना जाणविणे प सतत एकटे राहावेसे वाटणे प सतत नकारात्मक विचार मनात येणे प प्रचंड मानसिक थकवा जाणविणे प अति झोप अथवा निद्रानाश प अन्नावरची वासना जाणे प वजन वाढणे प छातीत धडधडणे प डोळ्यांवर गुंगी असणे प कोणतीही जबाबदारी घेण्याची भीती वाटणे प आयुष्य संपल्याची भावना प अति विचार प आत्महत्येचे विचार
नैराश्यावरील उपचार
प सतत चार ते सहा महिने वरील लक्षणे जाणवत असल्यास तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे असते. प एकटे न राहता लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करणे प डायरी लिहिणे प स्वतःवर प्रेम करणे प स्वत:लाही महत्त्व देणे प भीती व नकारात्मकता पसरवणाऱ्या व्यक्तींपासून लांब राहणे प ध्यानधारणा करणे प नियमित व्यायाम करणे प योग्य आहार.
ज्यावेळी मनात नकारात्मक विचारांचे काहूर माजेल त्यावेळी दीर्घ श्वास घेऊन मनामध्ये नको असलेल्या विचारांना “स्टॉप’ असे म्हणून ते विचार खंडित करण्याचा प्रयत्न करावा व तत्क्षणी आपल्या आवडीच्या कामात स्वतःला गुंतवण्याचा प्रयत्न करणे. तर्क शुद्ध विचार करणे.
मेंदूमधील सेरेटोनीन या रसायनाच्या बदलामुळे डिप्रेशन हा मानसिक आजार उद्भवतो. यावर वेळीच उपचार न घेतल्यास हा आजार जुना होऊन यातून आत्महत्येपर्यंतचे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते. त्यामुळे वेळीच तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन औषोधोपचार व नियमित समुपदेशन घेणे गरजेचे असते. नियमित उपचाराने हा आजार बरा होऊ शकतो अथवा आटोक्यात ठेवता येतो.
=================