Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

नॅनोशिप: जनरेशन Z मधील रिलेशनशिपचा नवा ट्रेंड

by
September 8, 2025
in रिलेशनशीप
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पूर्वीच्या काळात लग्न ही एक सामाजिक परंपरा होती, जी लहान वयातच पालकांद्वारे ठरवली जात असे. विवाहाचे निर्णय पूर्णपणे पालकांच्या हाती असत आणि मुला-मुलींच्या मताला फारशी किंमत दिली जात नसे. कालांतराने समाजात बदल घडला आणि लग्नासाठी ठराविक वय निश्चित करण्यात आलं. तरीही, बहुतांश विवाह पालकांच्या संमतीनेच होत राहिले. हळूहळू तरुणाईने स्वतःच्या पसंतीने जोडीदार निवडण्यास सुरुवात केली आणि लव्ह मॅरेजचा ट्रेंड रुजला.

आधुनिक युगात आणखी एक पाऊल पुढे टाकत लिव्ह-इन रिलेशनशिप ही संकल्पना लोकप्रिय झाली. यामध्ये जोडपे लग्न न करता एकत्र राहू लागले, पती-पत्नीप्रमाणे जीवन जगत, परंतु कोणत्याही कायदेशीर बंधनाशिवाय. ही संकल्पना तरुणाईने उचलून धरली, कारण यात स्वातंत्र्य आणि वैयक्तिक निवडींना प्राधान्य मिळालं.

आता जनरेशन Z मध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपलाही मागे टाकणारा एक नवा ट्रेंड उदयास आला आहे – तो म्हणजे ‘नॅनोशिप’. नॅनोशिप हा रिलेशनशिपचा एक असा प्रकार आहे, ज्यामध्ये जोडपे अत्यंत कमी कालावधीसाठी, म्हणजे 3 ते 4 दिवस किंवा जास्तीत जास्त एक आठवडा, एकत्र राहतात. या नात्यांमध्ये दीर्घकालीन कमिटमेंट, भावनिक गुंतवणूक किंवा जबाबदाऱ्या नसतात. जोडपे फक्त एकमेकांसोबत वेळ घालवतात, स्वातंत्र्याचा आनंद घेतात आणि काही दिवसांनी एकमेकांपासून वेगळे होऊन नातं संपुष्टात आणतात.

नॅनोशिपचा ट्रेंड का होतोय लोकप्रिय ?
नॅनोशिप हा प्रकार आजच्या तरुणाईला आकर्षक वाटतो, कारण तो स्वातंत्र्य आणि लवचिकतेवर आधारित आहे. आजच्या फास्ट-फॉरवर्ड आणि डिजिटल जगात, जिथे प्रत्येकजण आपल्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे, नॅनोशिप्समुळे कोणत्याही बंधनाशिवाय नात्याचा अनुभव घेता येतो. यामध्ये अपेक्षा किंवा जबाबदारीचा बोजा नसतो, त्यामुळे तरुणांना स्वतःसाठी वेळ आणि स्वातंत्र्य मिळतं.

हा ट्रेंड विशेषतः जनरेशन Z ला अपील करतो, कारण त्यांना पारंपरिक नात्यांमधील जटिलता आणि दीर्घकालीन वचनबद्धतेपेक्षा क्षणिक आनंद आणि स्वतंत्रतेची गरज जास्त वाटते. नॅनोशिप हे नातं अल्पकालीन आणि तात्पुरतं असलं, तरी आजच्या गतिमान जीवनशैलीत काहींसाठी हा एक योग्य पर्याय ठरतो आहे.

नॅनोशिप हा रिलेशनशिपचा नवा ट्रेंड समाजातील बदलत्या मूल्यांचा आणि तरुणाईच्या स्वातंत्र्यप्रिय वृत्तीचा पुरावा आहे. पारंपरिक लग्न, लव्ह मॅरेज, लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर आता नॅनोशिपच्या रूपाने तरुणाई आपल्या नात्यांमध्ये नव्या परिभाषेचा शोध घेत आहे. हा ट्रेंड भविष्यात कितपत रुजेल, हे काळच ठरवेल, पण सध्यातरी जनरेशन Z मध्ये याची क्रेझ वाढताना दिसत आहे.

Join our WhatsApp Channel

The post नॅनोशिप: जनरेशन Z मधील रिलेशनशिपचा नवा ट्रेंड appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar