Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

निरोगी राहण्यासाठी दररोज किती पाणी प्यावे?, या वेळेला पाणी पिण्याचे खुप फायदे

by प्रभात वृत्तसेवा
February 7, 2022
in लाईफस्टाईल
A A
निरोगी राहण्यासाठी दररोज किती पाणी प्यावे?, या वेळेला पाणी पिण्याचे खुप फायदे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

दिवसभरात किती प्रमाणात पाणी प्यावे? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. हायड्रेट राहण्यासाठी सतत थोड्या-थोड्या वेळाने पाणी प्यावे, हे आपण अनेकदा ऐकलेल असतं. “डिहायड्रेशन” ही अशी समस्या आहे, की जी सतत निर्माण होत असेल व त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. सतत डिहायड्रेशन झाल्यास थकवा, मळमळणं, चक्कर येणं, असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे अशक्‍तपणा देखील येऊ शकतो.

1. दररोज किती पाणी प्यावे? हा प्रश्‍न अनेकांना पडलेला असतो. दिवसभरात सतत पाणी पिणं फार गरजेचे आहे. दररोज किमान 2-3 लीटर पाणी तरी प्यायला हवं. जर तुम्ही खेळाडू किंवा ज्यांच्यामध्ये उष्णता तयार होते, अशा कामात असाल तर आपली पाणी पिण्याची गरज जास्त असू शकते.
2. निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही रोज सकाळी उठल्याबरोबर लगेचच एक ग्लास पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर अनोशी पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिण्यास सांगतात. जर पचनाची समस्या असेल तर गरम पाणी पिल्याने ती कमी होऊ शकते. गरम पाण्यामुळे पचन जलद होते आणि शरीरातील टॉक्‍सीन्स्‌ देखील बाहेर टाकले जातात.
3. जर तुम्हाला सतत कन्स्टीपेशनचा त्रास वारंवार होत असेल, तर गरम पाण्यात थोडसं लिंबू टाकून घेऊ शकता.
4. वर्कआऊट केल्यावर थंड पाणी पिणं फायदेशीर असतं. त्यावेळी तुमच्या शरीराचे तापमान प्रचंड वाढलेलं असत. थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते.

5. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्‍सीन्स्‌ बाहेर टाकले जातात. यामुळे किडनीचे कार्य सुरळील चालते. भरपूर पाणी प्यायल्याने रक्‍त आणि युरीन शुध्द होते.
6. डिहायड्रेशन झाल्यास त्वचा कोरडी व निस्तेज दिसू लागते. निरोगी त्वचेसाठी स्वत:ला हायड्रेट ठेवा.
7. डिहाड्रेशनमुळे बऱ्याचदा मायग्रेनचा त्रास सुरु होतो. सतत डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होत असेल तर नियमित पाणी प्यायल्याने कमी होते.
8. झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पायांमध्ये गोळे येत नाहीत. पायामध्ये गोळे किंवा क्रॅम्प येण्याचे प्रमुख कारण डिहायड्रेशन असू शकते.
9. झोपण्याआधी 30 मिनीटे आधी पाणी प्यावे. ज्यामुळे मध्यरात्री युरीनसाठी उठाव लागणार नाही. रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीराचे कार्य सुरळीत चालते व शरीर हायड्रेड राहते.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar