[[{“value”:”
Eli Lilly | Mounjaro : खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढणे आणि मधुमेह ही खूप सामान्य समस्या बनली आहे. लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी लोक विविध उपाय आणि औषधे वापरतात. अशा परिस्थितीत, अमेरिकन औषध कंपनी ‘एली लिली’ने अलीकडेच भारतात त्यांचे ‘मोंजारो’ औषध लाँच केले आहे, जे वजन कमी करण्यासाठी आणि टाइप २ मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे म्हटले जाते.
या औषधाचे रासायनिक नाव ‘टिर्जेपाटाइड’ आहे आणि भारतीय औषध नियामक सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने देखील या औषधाला मान्यता दिली आहे. ते लसीच्या स्वरूपात लोकांना दिले देण्यात येईल. हे औषध कशा प्रकारे काम करत, किंमत आणि तज्ञ याबद्दल काय म्हणतात यावर सुद्धा आपण बोलणार आहोत.
मोंजारो औषध कसे काम करते?
मोंजारो GLP-1 (ग्लुकागॉनसारखे पेप्टाइड-1) आणि GIP (ग्लुकोज-आश्रित इन्सुलिनोट्रोपिक पॉलीपेप्टाइड) नावाच्या दोन संप्रेरकांची क्रियाशीलता वाढवते. हे हार्मोन्स शरीरात इन्सुलिन स्राव वाढवतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यासोबतच, हे औषध भूक कमी करते आणि चयापचय वाढवते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे औषध रुग्णांना आठवड्यातून एकदा इंजेक्शन म्हणून दिले जाईल.
क्लिनिकल चाचणीचा निकाल काय लागला?
अमेरिकेत झालेल्या SURMOUNT-1 क्लिनिकल चाचणीमध्ये, टिर्झेपॅटाइड किंवा मोंजारोचा उच्च डोस (१५ मिग्रॅ) घेणाऱ्या सहभागींनी ७२ आठवड्यांत सरासरी २१.८ किलो वजन कमी केले, तर सर्वात कमी डोस (५ मिग्रॅ) घेणाऱ्यांनी १५.४ किलो वजन कमी केले.
भारतात मोंजारो औषधाची किंमत किती आहे?
मोंजारो भारतात सिंगल-डोस व्हिल म्हणून उपलब्ध आहे. २.५ मिलीग्रामच्या कुपीची किंमत सुमारे ३,५०० रुपये आहे आणि ५ मिलीग्रामच्या कुपीची किंमत ४, ३७५ रुपये आहे. या आधुनिक उपचारपद्धतीचा लाभ अधिकाधिक लोकांना घेता यावा यासाठी औषधाची किंमत निश्चित करण्यात आली आहे. अमेरिकेत या औषधाची किंमत १००० ते १२०० डॉलरच्या आसपास आहे. अमेरिकेत हे औषध Zepbound नावाने विक्री केली जाते.
तज्ञ काय म्हणतात?
आरएमएल रुग्णालयातील प्राध्यापक आणि औषध विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष गिरी यांच्या मते, मोंजारो हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी इंजेक्शनने वापरता येणारे औषध आहे. हे औषध टाइप-२ मधुमेहावर देखील प्रभावी आहे.
हे औषध शरीरातील दोन वेगवेगळ्या रिसेप्टर्सवर कार्य करते. हे औषध भूक नियंत्रित करते आणि तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे अतिरिक्त खाणे नियंत्रित होते आणि शरीरातील चरबीचे प्रमाण देखील कमी होते.
भारतातील लठ्ठपणा आणि टाइप २ मधुमेहाचा सामना करण्यासाठी मोंजारोचे लाँचिंग हे एक महत्त्वाचे पाऊल आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. हे औषध चयापचय आरोग्य सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रभावी सिद्ध होऊ शकते. अहवालांनुसार, भारतात सुमारे १०.१ कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत, ज्याचे मुख्य कारण लठ्ठपणा आहे. अशा परिस्थितीत, हे औषध लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
कंपनीचा इतिहास :
ज्या कंपनीने हे औषध बनवले आहे त्या कंपनीचे २०२४ पर्यंतचे मार्केट व्हॅल्युशन ८४२ अरब डॉलरच्या जवळपास आहे. कंपनीचा अंदाज आहे की २०३० पर्यंत या औषधांची विक्री १५० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.
ही औषध कंपनी १८७६ मध्ये, म्हणजे सुमारे १४९ वर्षांपूर्वी, एली लिली नावाच्या लष्करी सैनिकाने सुरू केली होती. कंपनीचा व्यवसाय १८ देशांमध्ये पसरलेला आहे. लिली ही जगातील पहिली फार्मा कंपनी आहे जी पोलिओ लस आणि इन्सुलिन तयार करते.
कंपनीचे अध्यक्ष काय म्हणतात, पाहा….
लिली इंडियाचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक विन्सलो टकर म्हणाले की, लठ्ठपणा आणि टाइप २ मधुमेह हे दुहेरी ओझे भारतात सार्वजनिक आरोग्यासमोरील एक मोठे आव्हान म्हणून वेगाने उदयास येत आहे. कंपनी “प्रतिबंध आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकार आणि उद्योगांसोबत सहकार्य करण्यास वचनबद्ध आहे. असं ते म्हणतात.
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय :
लिंबू पाणी – लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असतं, जे शरीराच्या फॅट बर्निंग प्रोसेसमध्ये मदत करतं. सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून पिणं ही एक प्रभावी पद्धत आहे. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
जिरे पाणी – जिरे पाणी पोटावरची चरबी कमी करण्यासाठी एक आदर्श उपाय आहे. रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे घालून उकळा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्या. जिरे पोटातील सूज कमी करतं, पचनक्रिया सुधारतं, आणि मेटाबॉलिज्म वाढवून पोटाची चरबी कमी करतं.
आले चहा – आलं हे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी एक उत्तम घटक आहे. आलं शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवून पचनक्रियेला मदत करतं. आलं चहा बनवून दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पिणं पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतं.
नारळाचं तेल – नारळाचं तेल शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतं, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होते. नियमित आहारात तूप किंवा इतर तेलाच्या जागी नारळाचं तेल वापरणं हे फायदेशीर आहे.
मेथी पाणी – मेथीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे वजन कमी करण्यास आणि पोटातील चरबी कमी करण्यास मदत करतात. मेथीचं पाणी तयार करण्यासाठी रात्री पाण्यात मेथी दाणे भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या.
फायबरयुक्त आहार – फायबरयुक्त आहार शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. पोटात सतत तृप्तीची भावना निर्माण करून फायबर जास्त खाणं टाळतो आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतो. आहारात संपूर्ण धान्यं, ओट्स, फळं, भाज्या यांचा समावेश करा.
नियमित व्यायाम – घरगुती उपायांसोबत नियमित व्यायाम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फक्त आहारावर अवलंबून राहून पोटाची चरबी कमी होणार नाही. यासाठी शारीरिक हालचाल आवश्यक आहे. योग, चालणं, धावणं किंवा सायकलिंग यासारखे व्यायाम नियमितपणे करा.
पुरेशी झोप – पुरेशी झोप घेतल्यास शरीरातील हार्मोनल संतुलन सुधारतं, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. झोपेच्या अभावामुळे शरीरात चरबी साठण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रात्री ७-८ तासांची झोप घेणं आवश्यक आहे.
घरगुती उपचारातून ठेवा मधुमेहावर नियंत्रण :
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आपण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आणि ते टाळणे महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त असे बरेच घरगुती उपचार आहेत ज्यातून तुम्ही मधुमेहावर नियंत्रण ठेवून सामान्य जीवन जगू शकता.
तुळशीची पाने – तुळशीच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. या व्यतिरिक्त असे अनेक घटक त्यात आढळतात जी पॅनक्रियाटिक बीटा सेल्स इन्सुलिनच्या दिशेने सक्रिय करतात. या पेशींमुळे इन्सुलिनचा स्राव वाढतो. सकाळी उठून रिकाम्या पोटी दोन ते तीन तुळशीची पाने चावून खा. आपण तुळशीचा रस देखील पिऊ शकता. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
दालचिनी पावडर – दालचिनीच्या वापरामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. हे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. नियमित सेवन केल्याने लठ्ठपणा देखील कमी होऊ शकतो. दालचिनी बारीक करून पूड करा आणि कोमट पाण्यात मिसळून प्या.
शेवग्याच्या पानांचा रस – शेवग्याच्या पानांचा रस मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्याची पाने वाटून पिळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी ते प्या. यामुळे साखरेची पातळी वाढणार नाही.
ग्रीन टी – ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण भरपूर असते. हे एक सक्रिय अँटी-ऑक्सिडेंट आहे, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी पिण्याचा नक्कीच फायदा होईल.
जांभळाच्या बिया – जांभळाच्या बिया मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. यासाठी, जांभळीच्या बिया प्रथम कोरडे करा आणि नंतर कोरडे झाल्यावर बारीक करून घ्या. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात या बियांची पूड टाकून हे पाणी प्या. यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यात मदत होईल.
The post ना व्यायाम…ना डाएट..! वजन कमी करणारे अमेरिकेचे ‘Mounjaro’ औषध भारतात; किती पैसे मोजावे लागतील, तज्ञ काय सांगता… appeared first on Dainik Prabhat.
“}]]