Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

नासाने शोधला पृथ्वीसारखाच नवीन ग्रह; माणसांच्या वास्तव्यासाठी योग्य असणार का?

by
May 31, 2024
in लाईफस्टाईल
A A
नासाने शोधला पृथ्वीसारखाच नवीन ग्रह; माणसांच्या वास्तव्यासाठी योग्य असणार का?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

वॉशिंग्टन : अंतराळात पृथ्वीव्यतिरिक्त आणखी एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असावी, अशी शक्यता अनेकदा व्यक्त करण्यात आलीआहे. याबाबत नासाच्या संशोधकांनी नुकताच मोठा खुलासा केला आहे. या संशोधकांनी एका नवीन संभाव्य ग्रहाचा शोध लावला असून तो एका ताऱ्याची परिक्रमा करत असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.

या नासाच्या स्पेस टेलिस्कोपचा वापर करून शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. या अनोख्या ग्रहाचा आकार पृथ्वीइतकाच आहे. हा ग्रह आपल्या सूर्यमालेच्या अगदी जवळ आहे. या ग्रहावर जीवसृष्टी असावी, असा अंदाज शास्त्रज्ञांना आहे. या नवीन संभाव्य ग्रहाचं नाव ग्लिझ १२ बी असं असून, शास्त्रीय भाषेत तो एक्स्ट्रासोलर ग्रह किंवा एक्सोप्लॅनेट म्हणून ओळखला जातो.  ग्लिझ १२ बी पृथ्वीपासून सुमारे ४० प्रकाशवर्षं लांब आहे. तो एका लहानशा ताऱ्याची परिक्रमा करतो.

संशोधकांनी ग्लिझ १२ बी ला त्याच्या मूळ लाल लघुताऱ्याला पार करताना पाहिलं. जेव्हा संशोधकांचे पथक या प्रकल्पावर काम करत होतं, तेव्हा त्यांना या ग्रहाचा परिभ्रमण कालावधी किंवा आकार काय असेल हे निश्चित माहिती नव्हतं. याचा आकार पृथ्वीसारखा असणे हे एक सुखद आश्चर्य होतं.

ग्लिझ १२ बी या एक्सोप्लॅनेटचा शोध नासाच्या ट्रान्झिटिंग एक्सोप्लेनेट सर्व्हे सॅटेलाइटने लावला आहे. या एक्सोप्लॅनेटची रुंदी पृथ्वीच्या तुलनेत अंदाजे १.१ पट असेल, असा अंदाज आहे. या रुंदीमुळे हा एक्सोप्लॅनेट आपल्या पृथ्वी आणि पृथ्वीची जुळी बहीण मानल्या जाणाऱ्या शुक्रासारखा आहे.

ग्लिझ १२ बीचा आकार सूर्याच्या आकारमानाच्या एक चतुर्थांश

ग्लिझ १२ बी त्याच्या ताऱ्याभोवती इतक्या जवळून प्रदक्षिणा घालतो की त्याचं एक वर्ष म्हणजे पृथ्वीवरचे १२.८ दिवस आहे. तथापि लाल लघुग्रह ग्लिझ १२ बीचा आकार सूर्याच्या आकारमानाच्या एक चतुर्थांश असल्याने तो आपल्या ताऱ्यापेक्षाही खूप थंड आहे.

हा ग्रह वास्तव्यासाठी योग्य असेल की नाही हे अस्पष्ट

ग्लिझ १२ बी वरचं वातावरण कसं आहे हे त्याचा शोध घेणाऱ्या दोन टीम अद्याप निश्चितपणे सांगू शकत नाहीत. त्यामुळे हा ग्रह वास्तव्यासाठी योग्य असेल की नाही हे अस्पष्ट आहे. परंतु संशोधक या बाबतीत काही प्रमाणात आशावादी आहेत.
ग्लिझ १२ बी ला शुक्राला सूर्याकडून मिळणाऱ्या किरणोत्सर्गापैकी सुमारे ८५ टक्के किरणोत्सर्ग प्राप्त होतो. परंतु, शुक्राच्या पृष्ठभागाच्या ८६७ अंश फॅरेनहाइट अर्थात ४६४ अंश सेल्सियस तापमानाच्या तुलनेत त्याच्या पृष्ठभागाचं तापमान १०७ अंश फॅरेनहाइट अर्थात ४२ अंश सेल्सियस आहे.

पृथ्वी आणि शुक्र हे दोन्ही सूर्याच्या राहण्यायोग्य झोनमध्ये असले तरी त्यापैकी एका ठिकाणी जीवन शक्य आहे आणि वातावरण अनुकूल आहे. दुसरं ठिकाण दुर्गम असून, तिथलं तापमान इतकं उष्ण आहे की शिसं देखील वितळू शकतं. ग्लिझ १२ बी चा अभ्यास केल्याने आम्हाला याचं कारण समजण्यास मदत होऊ शकते, असं संशोधकांनी सांगितलं आहे

The post नासाने शोधला पृथ्वीसारखाच नवीन ग्रह; माणसांच्या वास्तव्यासाठी योग्य असणार का? appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar