Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

नाना पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भंडारा पोलिसांनी अखेर त्या ‘मोदी’ला शोधले, पण…

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2022
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

भंडारा – कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केले होते. नाना पटोले यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर भाजपने राज्यभर आंदोलन करत नाना पटोलेंवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज भंडारा पोलिसांनी एका मोदी नावाच्या व्यक्तीला शोधून काढले आहे. पण हा गावगुंड नसल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यभरात नुकतच्या झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारदरम्यान नाना पटोले यांनी केलेल्या त्या विधानानंतर वाद निर्माण झाला होता. पण नंतर नाना पटोले यांनी सारवासारव करत मी देशाचे पंतप्रधान यांच्या विषयी बोललो नाही तर मोदी नावाच्या गावगुंडाविषयी बोलत असल्याचे वक्तव्य केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्‌विट करत नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी केली. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंचे उंची काढली होती. भाजपच्या अन्य नेत्यांनीही त्यांना लक्ष्य केले होते. मात्र पटोलेंच्या खुलाशामुळे त्या गावगुंड मोदीबाबत उत्सुकता निर्माण झली होती. अखेर त्याला हुडकुन काढण्यात आले.

दरम्यान, आज भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्‍यात गोंदी गावातील उमेश प्रेमचंद घरडे नावाचा व्यक्ती आहे. या व्यक्तीला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी आणि संपूर्ण परिवार नागपूर येथे राहतात. उमेश दोन वर्षांपासून गावातच एकटाच राहतो. दारू पिऊन गावकऱ्यांना तो शिवीगाळ करतो मात्र त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात कोणत्याही स्वरुपाची तक्रार नाही. तोच हा मोदी असल्याचा चमत्कारीक प्रकार आता सांगितला जातो आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे कोणी काही बोललेले नाही.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar