कोलोंबो – नाताळनिमित्त श्रीलंकेतील एक हजार कैद्यांची सुटका करण्याला अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांनी मंजूरी दिली आहे. देशभरातील तुरुंगांमधून या सर्व कैद्यांची आज सुटका करण्यात आली, असे अधिकार् यांनी सांगितले.
सुटका करण्यात आलेल्या कैद्यांमध्ये दंड भरू न शकलेल्या गरीब कैद्यांची संख्या लक्षणीय आहे. श्रीलंका हा बौद्ध बहुल लोकसंख्येचा देश आहे. त्यामुळे मे महिन्यातील वेसाकच्या निमित्ताने देखील एक हजार कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती.
हा दिवस बुद्धांचा जन्मदिन, दिव्यज्ञानप्राप्ती आणि महानिर्वाण म्हणून साजरा केला जातो. अइलिकडेच अमली पदार्थविरोधी मोहिमेचा भाग म्हणून १४ हजार जणांना अटक केली गेली आहे. नाताळनिमित्त या मोहिमेला स्थगिती दिली गेली आहे.
The post नाताळनिमित्त श्रीलंकेतील एक हजार कैद्यांची सुटका appeared first on Dainik Prabhat.