लंडन – दैनंदिन आयुष्य जगताना विविध नातेसंबंध जपावे लागतात आता नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक जर आपल्या नातवंडांमध्ये रमत असतील आणि त्यांच्याबरोबर खेळत असतील तर त्यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा होते. पण दुसरीकडे वयोवृद्ध नागरिकांना जर आपल्या आजारी जोडीदाराची देखभाल करावी लागत असेल, तर त्यांचा मानसिक तणाव वाढण्याचाही धोका असतो. लंडनमधील क्वीन्स कॉलेजमधील संशोधकांनी दीर्घ संशोधनानंतर हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्येष्ठ नागरिक आपल्या नातवंडांना घेऊन बागेमध्ये फिरायला जात असतील किंवा त्यांच्याबरोबर साधे साधे खेळ खेळत असतील किंवा त्यांच्यासोबत त्यांच्या भाषेत गप्पा मारत असतील,
तर त्याचा सकारात्मक फायदा ज्येष्ठ नागरिकांच्या मनावर होऊ शकतो आणि त्यांच्या मानसिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा होते पण ज्येष्ठ नागरिकांचा जोडीदार जर आजारी असेल आणि त्याची देखभाल या जेष्ठ नागरिकाला करावी लागत असेल. तर मात्र त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो त्यामुळे या जेष्ठ नागरिकाचे मानसिक आरोग्य बिघडू शकते क्विंस कॉलेजमधील संशोधकांनी 21 देशातील पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या एक लाख 90 हजार लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष प्रसारित केला आहे.
ज्येष्ठ नागरिक जर सामाजिक उपक्रमात सहभागी असतील किंवा पर्यावरण विषयक कार्यक्रमात सहभाग घेत असतील तरीसुद्धा त्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. हे या अभ्यासानंतर लक्षात आले जे जेष्ठ नागरिक एका आठवड्यात 12 तासापेक्षा जास्त कालावधीत आपल्या नातवंडांसमोर रमत असतील,
त्यांना इतर नागरिकांच्या तुलनेत कमी एकटेपणा जाणवतो आणि त्यांना जीवन जास्त सकारात्मक वाटू शकते नातवंडांना शाळेत सोडणे किंवा त्यांना शाळेतून घरी आणणे किंवा संध्याकाळी त्यांना बागेत घेऊन जाणे यासारख्या गोष्टींमुळे जेष्ठ नागरिकांचे सामाजिक संबंधही वाढतात आणि सुधारतात आणि त्याचाही परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो.
The post नातवंडांशी खेळल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते; पण आजारी जोडीदाराच्या देखभालीमुळे तणाव वाढतो appeared first on Dainik Prabhat.