
नातं असावं अतूट
September 15th, 8:58amSeptember 15th, 9:01am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
नातं हे अतूट असावे कारण एखाद्या शुल्लक कारणामुळेही आजकाल नातं तुटते हे वास्तव आहे. एकमेकांवर असलेला विश्वास असेल तर नातं अगदी घट्ट राहतं. पण विश्वासाला तडा गेला तर नात्यात दूरावा निर्माण होतो. त्यामुळे नातं सहज तुटू शकते. तुमच्या एखाद्या चुकीमुळेसुद्धा जोडीदार दुखावला जाऊन नाते तुटू शकते.
तुमच्या जोडीदारासोबत नेहमीच हसत खेळत रहावे. तुमच्या नात्याबद्दल प्रामाणिक नसाल तर नाते बिघडू शकते. त्यामुळे एकमेकांशी प्रामाणिक रहा. तुमच्यावर आंधळेपणाने विश्वास दाखवणाऱ्याचा विश्वास तुम्ही कधीही तुटू देऊ नका. त्यामुळे नाते आणखी मजबूत होते.
नात्यात एकमेकांच्या आवडी-निवडी जपा. कारण दोघांच्याही आवडी-निवडी सारख्याच असतील असे नाही. तुमच्या नात्यात कम्युनिकेशन गॅप नको. नातेसंबंध मजबूत ठेवण्यासाठी संवाद गरजेचा असतो. तुम्ही कामात व्यस्त असाल तरी तुमच्या जोडीदाराशी संवाद साधत राहा.
एकमेकांच्या निर्णयाचा आदर राखा. जोडीदाराला काय हवं नको याकडे लक्ष दिल्यास तुमच्या नात्यात आणखी बहार येतो. थोड्या थोड्या चुकांमुळे जोडीदाराला कमी लेखू नका. जोडीदारांच्या मतांचा आदर राखा. अशा लहानसहान बाबींकडे लक्ष दिल्यास तुमच्या नात्यास नवी पालवी फुटेल.