अवघ्या दोन दिवसांमध्ये आपण २०२१ साल संपवून २०२२ मध्ये पदार्पण करणार आहोत. नवीन वर्ष म्हंटलं की सर्वांचेच मन उत्साहाने आणि चैतन्याने फुलून जाते. या उत्साहातूनच मग पुढे नव्या वर्षासाठी नवे संकल्प केले जातात. अशा संकल्पांची यादी भली मोठी असली तरी त्यातले किती संकल्प आपण पूर्ण करतो आणि किती अर्ध्यावरच सोडून देतो हाही प्रश्न आहेच. असो. अशा या नवीन वर्षाच्या संकल्पांच्या यादीमध्ये एक संकल्प नक्कीच असतो अन् तो म्हणजे वाचन!
‘यावर्षी भरघोस वाचन करायचं, लायब्ररी जॉईन करायाची, वाचनासाठी वेळेची विशेष तरतूद करायची’ असा संकल्प तुम्ही आजवर अनेकदा केला असेल. मात्र नवं वर्षाचा उत्साह जसा हळूहळू मावळत जातो तसतसे वाचनासह इतरही संकल्प मागे पडत जातात. लायब्ररीला जायला वेळच मिळाला नाही, ऑफिसमध्ये खूप काम होत, सारखं पीसीसमोर बसून बसून डोळे दुखतायेत त्यामुळे वाचन मागे राहतंय अशी असंख्य कारण समोर येतात. सरतेशेवटी वर्षअखेरीस आपण ‘येणाऱ्या वर्षात नक्की करायचं’ अशी स्वतःचीच समजूत काढतो.
मधूनच मनाला एक विचार असाही स्पर्शून जातो की जर कोणी आपल्याला पुस्तकंचं वाचून दाखवली असती तर? लहानपणी आजी-आजोबा गोष्टी नाहीत का सांगत? तशीच जर कोणी पुस्तकं वाचून दाखवली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह! तर यावर्षी तुमच्या मनातील ही इच्छा आणि तुमचा वाचन करण्याचा नववर्षाचा संकल्प हे दोन्ही पूर्ण करण्यासाठी स्टोरीटेल विशेष ऑफर देतंय. स्टोरीटेल म्हणजे असा एक पर्याय आहे जिथं लाखो पुस्तकं तुम्ही ऑडिओ स्परूपात ऐकू शकता. यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नसून तुम्हाला केवळ ३९९ रुपयांमध्ये ही सुविधा मिळणार आहे. या वार्षिक प्लॅनची मूळ किंमत ११९८ रुपये असून तुम्हाला तो ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी विकत घेतल्यास केवळ ३९९ रुपयांना मिळणार आहे.
विशेष म्हणजे 399 च्या वार्षिक वर्गणीमध्ये 10 पेक्षा अधिक प्रादेशिक भाषांमधील ऑडिओ बुक्स आणि ई-बुक्ससाठी अनलिमिटेड ऍक्सेस दिला जात आहे. स्टोरीटेलचे मुख्य उद्दिष्ट हे मार्केटमध्ये उतरून ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आहे. सध्या स्टोरीटेल अॅपवर 2 लाखांपेक्षा जास्त पुस्तके आहेत. त्यात प्रत्येक आठवड्याला अनेक नवनवीन दर्जेदार पुस्तकांचा समावेश होत असतो. शिवाय केवळ 399 रुपयांत वर्षभर सबस्क्रिप्शन मिळत असल्याने स्टोरीटेलवर पुस्तकांची कॅटेगिरी वाढण्यास मदत होईल.
ऑडिओबुक्सला लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती
“ऑडिओबुक्सला लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. ऑडिओबुक्स वापरून पाहण्याची उत्सुकता लोकांमध्ये आहे. 11 प्रादेशिक भाषांमधील स्टोरीटेलवर उपलब्ध असणाऱ्या गोष्टींवर अनलिमिटेड ऍक्सेससोबत वार्षिक सदस्यता ऑफर देत आहोत. ग्राहकांचा कथांचा व पुस्तकांचा शोध पॉकेट-फ्रेंडली बनवणे हा यामागील एक हेतू आहे. आतापर्यंत एक कोटीहून अधिक जणांनी स्टोरीटेल अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करत आहेत. ग्राहकांच्या मनोरंजनासाठी आम्ही नेहमी नवीन गोष्टी आणण्यासाठी तयार असतो.” – योगेश दशरथ (स्टोरीटेलचे इंडिया कंट्री मॅनेजर)
स्टोरीटेलचे सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून आपले सदस्यत्व कन्फर्म करू शकता व तुमची मनपसंद पुस्तके ऐकू शकता..
https://www.storytel.com/in/en/c/annual
तसेच स्टोरीटेल अॅप Google Play Store : http://bit.ly/2rriZaU
आणि iOS अॅप स्टोअर : https://apple.co/2zUcGkG
या दोन्हींवर उपलब्ध आहे. तेथूनही तुम्ही सबस्क्रिप्शन मिळवू शकता.
स्टोरीटेलचे सबस्क्रिप्शन कसे विकत घ्याल हे जाऊन घेण्यासाठी ‘हा’ व्हिडीओ पहा
12 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध
स्टोरीटेल ही ऑडिओबुक आणि ईबुक अॅप्ससाठी 27 नोव्हेंबर 2017 रोजी भारतात लॉन्च केलेली स्ट्रीमिंग सेवा आहे. कंपनीचे स्टॉकहोम, स्वीडन येथे मुख्यालय आहे. सध्या जगभरात 25 देशांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. भारतात हे अॅप इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलगू, आसामी, ओडिया, गुजराती आणि कन्नड अशा 12 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. स्टोरीटेलवर दोन लाखांपेक्षा ऑडिओबुक आणि ईबुक आहेत. प्रत्येकजण कधीही, कुठेही शेअर करू शकेल आणि आनंद घेऊ शकेल अशा उत्तम कथा ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याचा स्टोरीटेलचा मानस आहे.