वॉशिंग्टन – स्वतःशी बोलण्याची सवय असणाऱ्या एखाद्या व्यक्तीबाबत नेहमीच चुकीच्या गोष्टी गृहीत धरल्या जातात अशा व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झाला आहे की काय असाही निष्कर्ष काढला जातो पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे स्वतःशी साधलेला संवाद हा माणसातील नकारात्मकता दूर करतो आणि त्याचे मानसिक स्वास्थ्य सुधारतो त्याचे व्यक्तिमत्त्वही खुलवतो अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले असून त्याचा अहवाल नुकतेव्ह प्रसिद्ध झाला आहे.
चांगल्या किंवा वाईट परिस्थितीमध्ये स्वतःशी संवाद साधला तर तो निश्चितच उपयुक्त ठरू शकतो वाईट परिस्थितीमध्ये नकारात्मक भावना मनात निर्माण होत असताना आपण जर स्वतःची संवाद साधला तर त्यामुळे नकारात्मक विचार दूर जातात असे या अहवालात म्हटले आहे स्वतःशी संवाद साधने हे एक शास्त्र आणि एक कलाही असून ही कला आत्मसात केल्यास त्याचा चांगला फायदा दिसून येतो असे संशोधकांचे म्हणणे आहे स्वसंवाद हा प्रत्येक माणसाच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनायला हवा असेही या संशोधकांनी म्हटले आहे आणि स्वसंवाद कसा साधायचा याबाबत काही तंत्रज्ञानही सुचवले आहे.
ज्या व्यक्तीला स्वतःशी संवाद साधायचा आहे त्यांनी स्वतःचे नाव घेऊन हा संवाद साधायला हवा आरशासमोर उभे राहून हा संवाद साधल्यास तो जास्त परिणामकारक ठरतो असे या संशोधकांचे म्हणणे आहे मानसशास्त्रज्ञ मेलींदा फौट्स यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे असा संवाद साधताना व्यक्तीने आपल्यातील चांगल्या गुणांवर जोर दिला आणि मी सक्षम आहे मी काहीही करू शकतो अशा प्रकारचे विचार व्यक्त केले तर ते फायदेशीर ठरू शकतात अर्थात स्वसंवाद साधताना आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करावे असे नाही तर हा संवाद साधत असताना आपल्या चुकांची कबुली जरी दिली तरी ती सुद्धा महत्त्वाची गोष्ट ठरू शकते असे या अहवालात म्हटले आहे
समाजातील प्रत्येकालाच इतरांना सल्ला देणे आवडत असते पण अनेकांना इतरांनी दिलेला हा सल्ला आवडत नाही अशा स्वसंवादाच्या माध्यमातून आपणच आपल्याला सल्ला दिला तर तो जास्त उपयुक्त ठरू शकतो असाही निष्कर्ष या संशोधनातून समोर आला आहे स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयोग करत असतानाच नागरिकांनी जर निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर तेसुद्धा अधिक फायदेशीर ठरू शकेल असेही या अहवालात सुचविण्यात आले आहे.
error: Content is protected !!