Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘नऊवारी’ घालून अमेरिकेत योग दिवस साजरा – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 22, 2021
in आरोग्य वार्ता
A A
‘नऊवारी’ घालून अमेरिकेत योग दिवस साजरा – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून अमेरिकेत नऊवारी साडी नेसून योग करण्याचा एक अनोखा विक्रम एका मराठमोळ्या स्त्री ने केला आहे.अमेरिकेत पर्यायावरण अभ्यासक असलेल्या डॉ.संगीता तोडमल यांच्या मार्गदर्शनाखाली आभासी पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जगभरातल्या 30 देशातील प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

तोडमल या इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन(INO)तथा आयुष मंत्रालयाच्या प्रतिनिधी म्हणून अमेरिकेत काम करतात. पूर्वीच्या काळी महिला नऊवारी साडी मध्ये झिम्मा,फुगडी,नागपंचमीचे फेर, भोंडला असे विविध कार्यक्रम करत असत. संस्कृतीचा हा वारसा जपत डॉ. तोडमल यांनी नऊवारी साडी नेसून अमेरिकेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. सुजाता पाटील आणि यश पाटील यांच्या संकल्पनेतून आणि अनंत बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

डॉ. संगीता तोडमल यांनी अमेरिकेत आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा जपत भारतीय भाज्यांची परसबाग फुलवली आहे.घनकचरा व्यवस्थापन आणि ‘ऑरगॅनिक फार्मिंग’ करून स्वतः त्या पालेभाज्या आणि फळभाज्या पिकवतात. या कार्यक्रमात नेदरलॅंड येथील किरण पवार त्यांनी तर सिंगापूर मधून सुनीता रिकामे-ढोले यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी प्रीतम कानडे,अर्चना रेमाने, शर्मिला ब्राह्मणे,भाग्यश्री कोते- सस्ते ,माधुरी सिनारे, गजेंद्र जाधव, निलेश इंगुळकर यांनी विशेष सहभाग घेतला.

प्रगत देशांनी भारतीय योगशास्त्राला मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहे. जागतिक स्तरावर भारतीय योग आणि योग प्रशिक्षक यांना मागणी आहे. आजचे धकाधकीचे वर्तमान आणि आधुनिक जीवनपद्धतीचा विचार करता तंत्रज्ञानाच्या जगात ‘योग’च जगाला तारू शकेल.आज कोरोना महामारीने सर्व जग थांबवले आहे. नैराश्याच्या गर्तेत जग लोटले जात असताना योगाच्या माध्यमातून लोकांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवणे गरजेचे आहे. डॉ. संगीता तोडमल(पर्यावरण अभ्यासक) यांनी असे मत यावेळी मांडले आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar