वाशिंग्टन – प्रदूषणाची तीव्रता आणि हृदयविकार याचा थेट संबंध असून ध्वनी प्रदूषण जास्त असलेल्या भागांमधील लोकांना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जास्त असते असा निष्कर्ष अमेरिकेत झालेल्या एका संशोधनातून समोर आला आहे अमेरिकेतील न्यू जर्सी मेडिकस या संस्थेने केलेल्या अहवालाप्रमाणे ज्या ठिकाणी गोंधळाचे आणि आवाजाचे प्रमाण जास्त आहे म्हणजेच ध्वनी प्रदूषणाची तीव्रता जास्त आहे तेथील लोकांना हृदयविकाराची समस्या जास्त तीव्रतेने जाणवते विमानतळ परिसरात राहणाऱ्या लोकांनाही विमानाच्या सततच्या आवाजामुळे हृदय विकाराची तीव्रता वाढण्याचा धोका असतो ज्या ठिकाणी विमानतळ आहे.
त्या परिसरात हार्ट अटॅकचे प्रमाण तब्बल 72 टक्क्यांनी वाढते असे या अहवालात म्हटले आहे जगभरात दरवर्षी हार्टअटॅकने जे लोक मृत्युमुखी पडतात त्यापैकी 20 पैकी एका रुग्णाचा मृत्यू ध्वनिप्रदूषणामुळे झालेल्या हृदयविकारामुळे झालेला असतो मोठ्या प्रमाणावरील आवाज गोंगाट या गोंधळामुळे लोकांच्या झोपेमध्ये व्यत्यय येतो.
त्यांना विश्रांती मिळू शकत नाही त्यामुळे ताण तणाव वाढतात त्याचा एकत्रित परिणाम म्हणून हृदय विकाराचा धक्का येऊ शकतो असे या अहवालात म्हटले आहे हा अभ्यास करणारे संशोधक कार्डिओलॉजिस्ट आबेल मोरेरा त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ज्याप्रमाणे रक्तदाब किंवा मधुमेह या विकारासाठी ध्वनिप्रदूषण कारणीभूत ठरू शकते त्याचप्रमाणे आता हृदयविकारासाठी सुद्धा कारणीभूत ठरत असल्याने सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे आणि आरोग्य तज्ञांनाही याबाबत गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे रात्री झोपताना आवाजाची तीव्रता 30 डेसिबल आणि दिवसभर काम करत असताना ती पन्नास डेसीबल असणे गरजेचे आहे यापेक्षा जास्त आवाजाची तीव्रता असेल तर ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
error: Content is protected !!